दारू वाहतूक करताना एसटी चालकाला पकडले

दारू वाहतूक करताना एसटी चालकाला पकडले

सिंधुदुर्गनगरी -  एसटी महामंडळाच्या बसमधूनच गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पणजी - देवगड बसचालकासच पकडण्यात आले. एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाच्या या कारवाईने एसटी विभागात खळबळ उडाली आहे.

एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाने सकाळी ओरोस बस स्थानकात तपासणी मोहीम सुरू केली. सकाळी अकराच्या सुमारास स्थानकावर पणजी-देवगड बस (एमएच -२०- बीएल- १२१०) आली. पथकाने प्रवाशानंतर मोर्चा बस चालकाकडे वळविला. बसचालकाची बॅग तपासली; तेव्हा बॅगमध्ये ११५० रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळली. त्यामुळे चालक सिकंदर उस्मान बटवाले याच्या विरोधात कणकवली दक्षता अधिकारी भानुदास कमलाकर मदने यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com