निवडणुकीआधी, नंतर मतपेट्या लालपरीतूनच जातात, हे सरकारने लक्षात ठेवावे

निवडणुकीआधी, नंतर मतपेट्या लालपरीतूनच जातात, हे सरकारने लक्षात ठेवावे

दाभोळ - निवडणुकीआधी व निवडणुकीनंतर मतपेट्या लालपरीतूनच जातात, एवढेच सरकारने लक्षात ठेवावे. एसटीचे परिवहन मंत्र्यांकडून केले जाणारे खासगीकरण, कंत्राटीकरण मारक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेने एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन अतिशय कमी आहे. महामंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होण्यास कामगार नव्हे, सरकारी धोरण व महामंडळाचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी केला.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या दापोली येथे रविवारी (ता. २४)झालेल्या ५५ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनात ताटे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. 

अजूनही अन्यायकारक कारवाया सुरूच आहेत, मात्र आमचा कर्मचारी मागे हटणार नाही. सरकारने  आमच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सरकारला हद्‌दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भरघोस वेतनवाढ करार केल्याने कर्मचारी वेडे होतील असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले. मात्र उंबरठ्यावरील निवडणुकांमध्ये मतदान करताना हा वेडा कुठलेही बटण दाबेल. 

यावेळी व्यासपीठावर सुनील तटकरे, संजय कदम, बाबाजी जाधव, शेखर निकम, जयवंत जालगावकर, राजेश गुजर, वैभव खेडेकर, एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी होते.

कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप करण्याचा इशारा
एसटी महामंडळाने २०१६-२०२० या कालावधीसाठी जाहीर केलेल्या ४ हजार ८४९ कोटीमध्येच संघटनेने एसटी प्रशासनास प्रस्ताव सादर केला. अप्रत्यक्ष खासगीकरण व कंत्राटीकरणाचा फेरविचार न केल्यास पुन्हा संपाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा संघटना जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com