रत्नागिरी - सिंधुदुर्गातील 615 उद्योगाची धडधड झाली सुरू....

start 615 industries in Ratnagiri Sindhudurg
start 615 industries in Ratnagiri Sindhudurg

चिपळूण (रत्नागिरी) :  रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसी मधील 615 उद्योजकांना आपले उत्पादन घेण्यास परवानगी मिळाली आहे. रत्नागिरीतील 508 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 107 उद्योगांत धडधड सुरू झाली आहे. 10 हजार 764 कामगार कामावर रुजू झाले आहेत. उद्योग सुरू झाल्याने अर्थचक्रही फिरू लागले आहे. 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील जनता कर्फ्यू आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे गेले सव्वा महिना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राची चक्रे थांबली होती. शासनाच्या परवानगीने आता टप्याटप्याने उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यतील अर्थकरणाला गती मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे हे सर्वात मोठी अौद्योगिक वसाहत आहे. येथे काही कंपन्या केमिकल रसायन तयार करतात. तर काही औषध आणि खत निर्मिती करतात. या कंपन्या बंद राहिल्या तर त्याचा परिणाम शेती व्यवसायावर होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी सुरवातीपासूनच काही कंपन्यांना चालू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र सोशल डिस्टन्स आणि शासनाचे इतर नियम पाळण्याची अट घालण्यात आली होती.

10 हजार 764 कामगार कामावर हजर

शासनाचे हे नियम पाळत खेर्डी, खडपोली, मिरजोळे, दापोली, साडवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ औद्योगिक वसाहतीत महिन्यानंतर कारखाने सुरू होण्यास सुरवात झाली आहे. काही कंपन्यांमध्ये 30 ते 40 टक्के कामगारांवर आणि एका शिफ्टमध्ये काम सुरू झाले आहे. टप्या टप्याने त्यात वाढ होणार आहे. परवानगी घेतलेले सर्व उद्योग सुरू होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमधील एकूण 970 कारखाने आहेत. यातील 508 कारखान्यांना आपले उत्पादन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे दहा हजार कामगार कामावर रूजू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये एकूण 211 कारखाने आहेत. यातील 107 कारखान्यांना परवानगी मिळाली आहे. येथे 764 कामगार कामावर हजर झाले आहेत. 

अर्थचक्र  लागले फिरू

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत. असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची आणि प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्याची जिल्ह्यातील आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे. शासनाच्या सूचनांचे पालन करून काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्रातील अर्थचक्र थांबले होते. उद्योग सुरू झाल्याने आता त्याला गती मिळणार आहे.

परशुराम करावडे कार्यकारी अभियंता, एमआयडीसी रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com