चौपदरीकरणाचा प्रारंभ संगमेश्‍वर तालुक्‍यातून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

देवरूख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आरवली ते तळेकांटे, तळेकांटे ते वाकेड या दोन टप्प्यांचे काम सुरू करण्याचे लेखी आदेश रस्ते विकास मंत्रालयाने कंत्राटदार कंपनीला दिल्याने चौपदरीकरणाचा प्रारंभ संगमेश्‍वर तालुक्‍यातून होणार हे निश्‍चित झाले आहे. यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रारंभ होणार आहे.
 
इंदापूर ते झारापदरम्यानचा महामार्ग रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, सिंधुदुर्गातील कणकवली व कुडाळ अशा तालुक्‍यांमधून जातो. या चौपदरीकरणसाठी तालुकानिहाय 11 टप्पे करण्यात आले आहेत. त्यातील कशेडीचा टप्पा वगळण्यात आला आहे. कशेडी घाट वगळता स्वतंत्रपणे निघालेल्या सहा टप्प्यांतील चौपदरीकरणाच्या निविदा पूर्णत्वास गेल्या आहेत. आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड, खारेपाटण ते कणकवली, कणकवली ते झाराप या पाच निविदा मंजुरीसाठी दिल्लीला राष्ट्रीय विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्या असून राजापूर-खारेपाटणचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
 
राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड या दोन टप्प्यांतील निविदेला मंजुरी देण्यात आली आहेत. या दोन्ही टप्प्यांचे काम मुंबईतील एमईपी या कंपनीला देण्यात आले आहे. इंदापूर ते झारापदरम्यान तिसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात प्रथम सदर दोन टप्पे सुरू होणार आहेत. यामुळे महामार्ग चौपदरीकरणाचा प्रारंभ आता संगमेश्‍वर तालुक्‍यातून होणार, हे निश्‍चित झाले आहे. पावसाळा संपताच या कामांचा नारळ फुटणार आहे.
 
*टप्प्याचे नाव *किलोमीटर * निविदा
*(खवटी (ता. खेड) ते पर्शराम (ता. चिपळूण) * 43.80 *1143 कोटी
* आरवली ते तळेकांटे (ता. संगमेश्‍वर) *40 किलोमीटर *1193 कोटी
तळेकांटे ते वाकेड *50.90 किलोमीटर *1294 कोटी
सिंधुदुर्ग जिल्हा
*खारेपाटण ते कणकवली *39 किलोमीटर *1040 कोटी
कणकवली ते झाराप *44 किलोमीटर *1442 कोटी रुपये.

Web Title: start the Sangameshwar district