मांडवी जेटी सुशोभीकरणाने होणार पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

रत्नागिरी - वॉटर स्पोर्टस्‌, साहसी खेळ, गुहेचा थरार, बॅकवॉटर सफारी, महिलांसाठी मुक्तांगण, एसटीतून रत्नागिरी दर्शन, हॅपी स्ट्रीट, अवकाश दर्शन, स्कुबा डायव्हिंग, नृत्य आणि आविष्कार यांच्यासह विविध सांस्कृतिक आणि बहारदार कार्यक्रमांची रेलचेल रत्नागिरी पालिकेच्या पर्यटन व खाद्यमहोत्सवात अनुभवायला मिळेल. चला करू पर्यटन वारी साद घालते रत्नागिरी, ही घोषणा पर्यटकांना साद घालत आहे. 

पालिकेच्या पर्यटन महोत्सवाची वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. 29, 30 आणि 1 मे असा हा महोत्सव होणार आहे. 28 तारखेला मांडवी जेटी सुशोभीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार उदय सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. 29 तारखेला सायंकाळी 5 वाजता भगवती मंदिर येथे पर्यटन रॅलीचा प्रारंभ. साडेसहा वाजता पर्यटन महोत्सवाचे औपचारिक उद्‌घाटन, सात वाजता नंदेश उमप यांचे "मी मराठी' हा 80 कलाकारांच्या संचातील एक मराठमोळा सोहळा. (स्थळ - स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल), 30 ला सकाळी 7 ते 8 हॅपी स्ट्रीट, आरोग्य मंदिर, सकाळी साडेदहा वाजता शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, (नाट्यगृह), सायंकाळी साडेचार वाजता हॅपी स्ट्रीट टिळक आळी. सायंकाळी साडेसह वाजता "झी सारेगाम'फेम गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांचा कार्यक्रम. 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचा समारोप, 7 वाजता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि कलाकारांचा शिंदेशाही तोडा आदी कार्यक्रमांची मोफत मेजवानी आहे. 

शहरातील पर्यटनस्थळे 

थिबा राजवाडा, जिजामाता उद्यान, पतितपावन मंदिर, शासकीय मत्स्यालय, पांढरा समुद्र (मिऱ्या), किल्ले रत्नदुर्ग, श्री देव भैरी मंदिर, मांडवी किनारा (काळा समुद्र), मिरकरवाडा बंदर, अठरा हातांचा वीरविघ्नेश्‍वर, लोकमान्य टिळक जन्मभूमी, श्री लक्ष्मीकेशव व श्रीकृष्णपिंगाक्ष मंदिर - कर्ले, श्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कारावासाचे स्मृतिस्थळ आदी स्थळे पर्यटकांना गाइडच्या माध्यमातून माहिती करून देण्यात येणार आहेत. 

Web Title: Start of tourism festival