ठाण्यात अभिनय कला केंद्र सुरु

अमित गवळे
शुक्रवार, 15 जून 2018

प्रत्येकामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. परंतू अंगी कलाकौशल्य असून देखील अभिनयाच्या चंदेरी दुनियेची वाट बिकट असल्याने किंवा माहित नसल्याने अनेकांमधील हरहुन्नरी कलाकार दडपून जातो. परंतू ठाण्यातील चंदेरी दुनियेतील दोन तरूणांनी स्वत: पुढाकार घेत ठाण्यात नवोदित आणि हौशी कलाकारांसाठी ‘अभिनय कला केंद्र’ नावाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

पाली - प्रत्येकामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. परंतू अंगी कलाकौशल्य असून देखील अभिनयाच्या चंदेरी दुनियेची वाट बिकट असल्याने किंवा माहित नसल्याने अनेकांमधील हरहुन्नरी कलाकार दडपून जातो. परंतू ठाण्यातील चंदेरी दुनियेतील दोन तरूणांनी स्वत: पुढाकार घेत ठाण्यात नवोदित आणि हौशी कलाकारांसाठी ‘अभिनय कला केंद्र’ नावाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

फ्रेंडशीप बॅंड या मराठी चित्रपटात मुख्य भुमिका साकारलेले अभिनेता रोहित गायकवाड हे ‘अभिनय कला केंद्र’ या संस्थेचे अध्यक्ष अाहेत. तर अनेक मालिका व नाटकातून काम करणारे करण पेणकर या संस्थेचे संस्थापक आहेत. या दोन कलाकारांनी फक्त तरूण वा नवोदितांनाच व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे नाही, तर खास दिव्यांग मुलांनाही इथे सहभागी केले आहे. त्यांच्यातील उपजत अभिनय कलागुणांना बहर देण्यासाठीही अभिनय कलाकेंद्र प्रयत्न करीत आहे.

अभिनय कला केंद्र हे ठाण्यात कचराली तलाव येथे दर रविवारी भरत अाहे. तेथे ठा.म.पा परिवहन समितीचे सदस्य राजेश मोरे यांनी ‘अभिनय कला केंद्रासाठी’ खास रंगमंच उपलब्ध केले आहे. दर रविवारी अभिनय कला केंद्रात नवनवीन उपक्रम होत अाहेत. त्यात नवोदितांना अापले कलाकौशल्य सादर करण्याची संधी दिली जाते. या ठिकाणी नवोदित कलाकार एकांकिका, एकपत्री, द्विपात्री व नृत्य अभियनय सादर करत आहेत. नाट्य-चित्रपट क्षेत्रातील मान्यवर या ठीकाणी येवून नवोदितांना मार्गदर्शन करत आहेत. अभिनय कला केंद्राचे आता पर्यंत सात कट्टे झाले असून अनेक प्रसिध्द अभिनेते आणि मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले अाहेत. प्रस्तुत व्यासपीठ सर्वांसाठी खुले असून येथे कोणतेही शुक्ल अाकारले जात नाही. आपल्यातील अंगीभूत अभिनय कलागुणांना वाव देण्यासाठी अभिनय कला केंद्रात नक्की सहभागी व्हा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष, दिग्दर्शक व कलाकार रोहित गायकवाड यांनी केले आहे

येथे येणा-या नवोदीत कलाकारांना त्यांच्यातील प्रतिभे नुसार मालिका, नाटक व चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. दानशूर व व्यासंगी व्यक्तिंनी अामच्या या कलाकेंद्रास वस्तू स्वरुपात मदत करावी. असे मत अभिनय कला केंद्राचे अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी व्यक्त केले.

Web Title: Started acting center in thane