पनवेल रोहा रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्ते बांधण्याचे काम सुरू 

rasayni
rasayni

रसायनी (रायगड) - रसायनीतील पनवेल रोहा रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना बंद फाटकामुळे नागरिकांचा होणारा खोंळबा तसेच भविष्यात मार्गावर आणखीन लोकल गाड्या सुरू कराव्या लागतील आदि बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनांने परीसरात लाडिवली, कष्टकरीनगर आणि देवळोली या गावांच्या तीन ठिकाणी रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

रसायनी परीसरातील लाडिवली, आकुलवाडी, कष्टकरीनगर, जुनी पोसरी, पोसरी आदिवासीवाडी, देशमुखवाडी, देवळोली आदिवासीवाडी आदि गावांतील ग्रामस्थांना कोकण रेल्वे मार्ग ओलांडुन गावात जावे लागत आहे. दरम्यान रेल्वे मार्गावरून रेल्वे गाडी जाताना, गाडी जाई पर्यंत नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी थांबून रहावे लागत आहे. गाडी जाण्यासाठी उशीर झाला, तर गाडी जाई पर्यंत ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे  गेटमन आणि नागरिक यांच्यात अनेकदा भांडण झाले असल्याचे समोर आले आहे. लाडिवली येथे रेल्वे मार्गावर भुयारी रस्ता बांधण्यात यावा आशी मागणी केली होती. त्यासाठी गावातील ग्रामस्थांनी आंदोलन सुध्दा केले आहे. असे सांगण्यात आले. 

दरम्यान सुरक्षितीतेचा उपाय आणि  होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लाडिवली, कष्टकरीनगर, देवळोली या तीन ठिकाणी भुयारी रस्ते बांधण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागरिकांना गावात जाण्यासाठी चांगली सोय होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. तर पावसाळ्यापुर्वी काम पुर्ण होईल असे सुत्रातुन सांगण्यात आले. 

तर भुयारी रस्त्यावरून सर्व प्रकाराची वाहन जाऊ शकतील त्यासाठी पुरेशी उंची ठेवावी, तसेच पावसाळ्यात पाणी साचुन वाहतुकीस आडथळा होऊ नये, त्याकरिता उपाय योजना करावी आशी मागणी देवळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी भांडारकर आणि ग्रामस्थांनी केली आहे. या बाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठ पुरावा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com