रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटी | State Government Budget | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Airport

रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटी

रत्नागिरी : अनेक वर्षे रखडलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये १०० कोटींची तरतूद केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्रासाठी दोन कोटी, राज्यातील महापुरुषांशी संबंधित १० शाळांमध्ये जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळणार आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गासाठीही भरीव तरतूद करण्यात आली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासाला बूस्टर मिळाला. रत्नागिरी विमानतळावरून खासगी प्रवासी वाहतुकीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी विमान पार्किंग आणि काही यंत्रणा उभारण्यासाठी भूसंपादन आणि नवीन बांधकामासाठी निधीची गरज होती. या अर्थसंकल्पात विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

कोकण कृषी विद्यापीठासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्राच्या विकासासाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची घोषणा अजित पवार यांनी गेल्यावर्षी केली होती. या मार्गावरील रेवस आणि कारंजा यांना जोडण्याऱ्या धरमतर खाडीवरील दोन किमी लांबीच्या ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा मोठ्या चौपदरी खाडी पुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी एक हजार १०० हेक्टर भूसंपादनसाठी ५०० कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे.

मुरूड, पालगडच्या शाळांसाठी निधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्याक्रमांतर्गत ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या शाळाचा विकास करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील महापुरुषांशी संबंधित १० शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव मुरूड (ता. दापोली), साने गुरुजी यांचे जन्मगाव पालगड (ता. दापोली) या शाळांमधील शैक्षणिक सुविधा सुधारणांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Web Title: State Government Budget 100 Crore For Ratnagiri Airport

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top