राज्य सरकारी कर्मचारी जाणार तीन दिवस संपावर

अमित गवळे 
शुक्रवार, 27 जुलै 2018

पाली - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दर्लुक्ष करीत असुन, फसवणूक करीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी ७ ते ९ ऑगस्ट या दिवस लाक्षणिक संपावर जाणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदिप नागे यांच्या अध्यक्षतेखाली सुधागड व खालापूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सभा गुरुवारी (ता.२६) येथील तहसिल कार्यालयात झाली.

सातवा वेतन आयोग मिळणे, अंशदायी पेन्शन योजना रदद करावी, कंत्राटीकरण बंद करावे, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील १९ लाख कर्मचारी ७, ८ आणि ९ ऑगस्टला तीन दिवसांचा लाक्षणिक संप करणार आहेत. यात सहभागी होणार असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांनी सांगून हसंप यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष बी .डी. हारपुडे यांनी शासनाच्या नाकर्तेपणा मुळे आपल्याला हा संप करावा लागत असुन सर्वांनी एकत्र येऊन हा संप यशस्वी करावा असे आवाहन केले.

तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  तालुका शाखा सरचिटणीस जावेद जमादार यांनी आभार मानले. सभेस ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानीस,कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरीश देशमुख आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या उपस्थित होते.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या मागण्यां करिता या पूर्वी निदर्शने, निवेदने आणि एक दिवसांचा संप देखील करण्यात आला होता. तसेच जानेवारी व जुलै २०१७ ला संघटनेने तीन दिवसांचा संप जाहीर केला होता. मात्र या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संघटनेबरोबर चर्चा करून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. परिणामी संघटनेने संप स्थगित केला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला एक वर्ष होऊन देखील सरकार कडून आमच्या मागण्या बद्दल वेळकाढू धोरण अवलंबिले गेले. तसेच आंदोलनाची दखल न घेतल्याने नाईलाजाने संघटनेला संप करावा लागत आहे. असे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक यांनी सकाळला सांगितले.

Web Title: State Government employees to leave for three days