esakal | वादळामुळे मच्छीमार पुन्हा एकदा चिंतेत, नौका हलविल्या
sakal

बोलून बातमी शोधा

boat

वादळामुळे मच्छीमार पुन्हा एकदा चिंतेत, नौका हलविल्या

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे : चार दिवस बिघडलेल्या वातावरणामुळे तसेच शासनाने अलर्ट दिल्यामुळे मच्छीमारबांधवांनी नौका जयगड, दाभोळ, व आंजर्ले खाडीत सुरक्षिततेसाठी हलविल्या. त्यामुळे मासेमारी उद्योगाला कुठे नुकतीच सुरुवात झाली असताना वादळामुळे मच्छीमार पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे.

शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात झाली. परंतु हळूहळू करून आजपर्यंत फक्त हर्णे बंदरातील हजारो नौकांपैकी सहा आणि दोन सिलेंडर धरून फक्त १५० नौका मासेमारीकरिता बाहेर पडल्या आहेत. परंतु गेले महिनाभर मासळीची अवाकच झाली नाही. सर्व खर्च अंगावरच पडत होता. गणपतीपर्यंत हा उद्योग खलाशी आणि नौकामालक यांच्यात भागिदारीत असतो. परंतु मासळीचा दुष्काळच झाल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे. त्यात ता. ५ पासून ते ९ तारखेपर्यंत शासनाने वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच तशी ४० ते ५० किमी वेगाने वेगवान वारे वाहतील वाऱ्याचा वेग ६० किमी पर्यंत जण्याची शक्यता आहे अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे. त्या भीतीने सर्व मच्छीमारांनी मिळेल त्या खाडीमध्ये पलायन केले.

हेही वाचा: औसा तालुक्यात पैशासाठी विवाहितेचा छळ; पती विरोधात गुन्हा दाखल

किमान ४० नौका जयगड खाडीत, तर दाभोळ खाडीत २० नौका , आणि उर्वरित पुन्हा आंजर्ले खाडीत घुसल्या आहेत वादळापासून सुरक्षिततेसाठी म्हणून मच्छीमारांची एकच धावपळ उडाली होती. काल ता ६ रोजी किमान १० नौकांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आसरा घेतला होता परंतु एका नौका भरकटलेली बघून वातावरण थोडं शांत झाल्यावर आंजर्ले खाडीत पलायन केले. अचानक आलेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे गणपतीअगोदरच्या हंगामात मच्छीमारांचे तोंडचं फुटले आहे. १५ दिवसांकरिता मासेमारीला जाताना किमान दीड लाखाचा खर्च करून मच्छीमार गेले होते परंतु येताना २० हजारांची देखील मासळी न मिळाल्याने पुढचा हंगामात मासेमारी उद्योग करायचा का? असा प्रश्न येथील मच्छीमाराना पडला आहे.

महिनाभराचा हा हंगाम हा खूपच तोट्यातच गेला आहे. आणि आता हे वादळ आल्याने वातावरण बिघडले. त्यामुळे घाबरून सर्व नौका जयगड, दाभोळ, आणि आंजर्ले खाडीत घुसल्या आहेत. त्यामुळे खूपच नुकसान झाले आहे. अशी माहिती मच्छीमार अनंत चोगले यांनी सांगितले.

वादळामुळे नौकांची पळापळ झाली आहे. जिथे मिळेल त्या खाडीत आसरा नौकांनी आसरा घेतला आहे. आता हा हंगाम संपला. जरी वादळ शांत झाले तरी गणपती सण संपल्यावरच नवीन हंगाम सुरू होईल असे येथील माजी उपसरपंच प्रकाश रघुविर यांनी सांगितले.

loading image
go to top