स्ट्रॉबेरीलाही लाभली लाल मातीची गोडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

राजापूर - तालुक्‍यातील ओशिवळे येथे ‘कोकणबाग विदीशा गार्डन’मध्ये स्ट्रॉबेरीचे पिक घेतले आहे.कोकणच्या लाल मातीमध्ये महाबळेश्‍वरची प्रसिद्ध पाच जातीची स्ट्रॉबेरी तयार झाली आहेत. लाल मातीसह नोव्हेंबरनंतरचे थंड हवामान स्ट्रॉबेरीला चांगलेच मानवले. महाबळेश्‍वरपेक्षा दीड पट मोठी स्टॉबेरी तयार झाली, अशी माहिती लागवड करणाऱ्या गजानन व महेश पळसुलेदेसाई यांनी दिली.

वहाळाच्या काठावरील जागेचे माती परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये दोन हजार रोपांची सरी पद्धतीने लागवड केली. रोपांना मातीमधून ‘संवर्धन’ खताची मात्रा तर, रोपांच्या पोषणासाठी ‘अन्नद्रव्या’ची पाण्याद्वारे मात्रा देण्यात आली. रोपांना नियमित पाणी व आवश्‍यकतेनुसार कीटकनाशक 
फवारणी केल्याचे गजानन यांनी सांगितले. सरीवर मलचिंग पेपर वापरल्याने अनावश्‍यक तणही आले नाही. नियमित निरीक्षण आणि मेहनतीतून वाढविलेल्या रोपांना आता २०-२५ ग्रॅमपासून ५५-६० ग्रॅम वजनापर्यंतची स्ट्रॉबेरी लगडली आहे. 

‘कोकणबाग विदीशा गार्डन’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ‘नवजीवन’ संस्थेने पुढाकार घेतला. त्याला यश मिळाल्याचे  समाधान आहे. महाबळेश्‍वर येथील शेतकरी संजय बावलेकर, कोकण कृषी विद्यापीठाचे प्रा. दडेमल, कोल्हापूर येथील उद्यानपंडित शिवाजी कचरे यांचे मार्गदर्शन या जोडीला प्रकल्पाचे मॅनेजर रवींद्र भागवत यांची मेहनतही महत्त्वाची असल्याचे पळसुले यांनी सांगितले.

Web Title: strawberry plantation in Konkan

टॅग्स