गावांमधील धोकादायक विजेचे खांब अजूनही जैसे थे!

अमित गवळे
मंगळवार, 3 जुलै 2018

पाली (रायगड) : सिद्धेश्वर बू. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर, खांडसई, पुई, वावळोली गाव व आश्रमशाळा, तसेच कळंब अादिवासीवाडीवरील सहा विजेचे खांब धोकादायक झाले आहेत. जीर्ण, वाकलेले व मोडकळीस अालेले हे खांब केव्हाही कोसळू शकता. त्यामुळे मोठी जिवितहानी होण्याचा धोका आहे. यासंदर्भात अर्ज-विनंत्या करुनही विज वितरण कार्यालयाकडून कुठलीही कारवाई केली गेलेली नाही.

गावांतील धोकादायक खांब व खांबांवरील दिवे बदलण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीत, सुधागड पाली यांना ३० जानेवारी व ८ एप्रिल रोजी अर्ज पाठविण्यात आले आहेत. ८ एप्रिलच्या अर्जाची एक प्रत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीत. चे अधिक्षक अभियंता, पेण, कार्यकारी अभियंता रोहा, जिल्हाधिकारी रायगड, अामदार धैर्यशिल पाटील, व तहसिलदार पाली-सुधागड यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. मात्र या गंभीर परिस्थिती संदर्भात अजुनही कुठलीच कार्यवाही केली गेलेली नाही. 

यातील एक धोकादायक खांब वावळोली येथील अादिवासी अाश्रमशाळेपासून काही अंतरावर अाहे. तर इतर खांब लोकवस्ती जवळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात व वादळी वा-यामुळे हे पोल कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. अशी माहिती सिद्धेश्वर ग्रामपंचायत सदस्य योगेश सुरावकर यांनी सकाळला दिली. परिणामी या धोकादायक खांबांमुळे ग्रामस्थ, विदयार्थी व जनावरांच्या जिवितास धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी व वेळेत हे पोल बदलुन व दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

विज वितरण कार्यालयाकडे याबाबत वारंवार लेखी व तोंडी तक्रार केली अाहे. खांब बदलण्यासाठी काँन्ट्रॅक्टर उपलब्ध नाही असे तिथून सांगण्यात येते. यासंदर्भात अाजतागायत कुठलेही काम झालेले नाही.खांब लवकर दुरुस्त झाले नाही मोठा धोका संभवू शकतो. त्यामूळे विजवितरण कंपनी, प्रशासन व लोकप्रतिनीधींनी या संदर्भात त्वरीत कार्यवाही केली पाहीजे.
- उमेश यादव, सरपंच, ग्रुप ग्रामपंचाय, सिद्धेश्वर बू.

Web Title: street light lamp in danger condition in pali