आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’चे चिपळूण येथे आयोजन

रत्नागिरी - ‘सकाळ विद्या’ व ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी’च्या वतीने इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र येत्या रविवारी (ता. २९) सकाळी १० वाजता चिपळूण येथील लक्ष्मीबाई मारुतीराव बांधल शाळेमध्ये होणार आहे. 

या विशेष चर्चासत्रात दहावीचा अभ्यास कसा करावा याच्या टिप्स, त्याचबरोबर शेवटच्या महिन्यामध्ये अभ्यासाची उजळणी व तयारी कशी करावी, दहावीनंतरच्या करिअरच्या संधी, दहावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च, मॅनेजमेंट, डिझाइन, आर्किटेक्‍चर, आर्टस्‌, सायन्स आणि कॉमर्समधील करिअरच्या संधी, त्यांच्या प्रवेशप्रक्रिया, त्यांचा अभ्यासक्रम व बदललेले स्वरूप, त्यांची तयारी आठवी, नववीपासूनच कशी करावी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरची विविध क्षेत्रे व संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रिया, बदलते शैक्षणिक धोरण व नवीन परीक्षा पद्धती अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. 

आजच्या स्पर्धेच्या युगात दहावी, बारावीच्या पातळीवर घेतलेले निर्णय विद्यार्थ्यांच्या भावी करिअरची दिशा ठरवितात. अशा वेळेस दहावीनंतरचा शिक्षणाचा मार्ग, उपलब्ध संधी व विद्यार्थ्यांचा कल व कौशल्ये यांचा विचार करून करिअरचा योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यादृष्टीने हे चर्चासत्र अत्यंत उपयुक्त आहे. तसेच असे निर्णय घेताना विद्यार्थी व पालक यांच्या मनात अनेक प्रश्‍न असतात. या प्रश्‍नांची तज्ज्ञांमार्फत उत्तरे विद्यार्थी व पालकांना या चर्चासत्रात मिळतील. 
 
कधी : रविवार, २९ जानेवारी २०१७ 
केव्हा : वेळ : सकाळी १०.वा. 
कोठे : लक्ष्मीबाई मारुतीराव बांधल शाळा सभागृह, कावीळतळी, चिपळूण 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९८५००६४१४८ 
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य

Web Title: student carrier guidance