विद्यार्थ्यांचे ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांवर भाष्य

अमित गवळे  
रविवार, 29 जुलै 2018

पाली : शतकातल्या सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाची पौर्णिमा झाली. पेण तालुक्यातील राजिप कार्ली शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांवर भाष्य केले. त्याबरोबरच सूर्य व चंद्रग्रहणाचे प्रत्यक्षित व ऍनिमेशन द्वारे सखोल माहिती घेतली.
विद्यार्थ्यांनी ग्रहणाचे प्रत्यक्षित करून प्रत्यक्ष अनुभव घेतला. ग्रामीण भागातील लोकांमध्ये या संदर्भात अनेक समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. या वेळी विद्यार्थ्यांनी गावातील लोकांचे या संदर्भात प्रबोधन करणार असल्याची ग्वाही दिली. 

शिक्षक मोहन भोईर यांनी सकाळला सांगितले की शाळेत इतर सर्व शाळांप्रमाणेच दैनंदिन परिपाठ होतो. यावेळी दिनदर्शिकेत यासोबत दिनविशेष ही लिहिले जाते आणि त्यावर आवश्यकता वाटल्यास परिपाठात चर्चा केली जाते. आषाढ पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्याने ग्रहणाविषयी बोलणार होतोच, शिवाय अॅनिमेशन व्हिडिओ द्वारे ही मुलांना अनुभव देणार होतो. मात्र पुस्तकातून दिनविशेष लिहिताना मुले आजच्या ग्रहणाविषयी चर्चा करत असलेली ऐकले. त्यांना म्हटले आज दिनविशेष म्हणून चंद्रग्रहणच लिहा.

परिपाठात ग्रहण या विषयावर चर्चा करताना चंद्रग्रहण कसे होते याबाबत अचूक माहिती सांगितली. कारण ३१ जानेवारीच्या चंद्रग्रहणावेळी मुलांनी चंद्रग्रहणाचे प्रात्यक्षिक केले होते. सुर्यग्रहण कसे होते हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. अधिक माहितीसाठी ग्रहणाचे अॅनिमेशन व्हिडिओ दाखवून चर्चा केली. ग्रहण काळात गावातील घरातील मोठी माणसे व मुले  काय करतात या विषयी विचारले तर,  आई, बाबा,आजी, आजोबा जेवत नाहीत व मुले जेवतात असे सांगितले. मागच्या ग्रहणाच्या रात्री गावतले बाप्ये 'गिऱ्या, गिऱ्या म्हातारीला धर नि आमच्या देवाला सोड' असे तांदूळ उडवून बोलतात अशीही माहिती मुलांनी दिली. त्यानंतर ग्रहणाच्या संदर्भात येणाऱ्या इतर अंधश्रद्धांवर सखोल चर्चा झाली. आताच्या ग्रहणाला 'गिऱ्या, गिऱ्या म्हातारीला धर नि आमच्या देवाला सोड' असे म्हणणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची सावली आहे, चंद्राला कोणी धरलेले नाही असे त्या माणसांना सांगू हे विद्यार्थ्यांनी ठामपणे सांगितले.  चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येईल का? या प्रश्नावर 'असे कधीच होणार नाही' अपेक्षित उत्तर मिळाल्यामुळे आषाढ पौर्णिमेचे ग्रहण मुलांना चांगल्या प्रकारे समजले. 

Web Title: student speech on superstitions regarding eclipse