गणिताच्या समृद्धीकरणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार संच

तुषार सावंत
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पहिली ते पाचवीसाठी उपक्रम - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान 

कणकवली - प्रत्येक मुलास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गणित विषयाच्या समृद्धीकरणासाठी लवकरच संच दिला जाणार आहे. वर्गातील सहा मुलामध्ये प्रत्येकी एक संच वितरित होणार असून विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी साहित्यातून विषयाची मांडणी केली जाणार आहे.  

पहिली ते पाचवीसाठी उपक्रम - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान 

कणकवली - प्रत्येक मुलास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गणित विषयाच्या समृद्धीकरणासाठी लवकरच संच दिला जाणार आहे. वर्गातील सहा मुलामध्ये प्रत्येकी एक संच वितरित होणार असून विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी साहित्यातून विषयाची मांडणी केली जाणार आहे.  

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घटत्या पटसंख्येला लगाम घालण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शाळामध्ये बायोमॅट्रिक उपस्थिती बरोबरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सेल्फीसारखा फंडा अवलंबिला. याला शिक्षण तज्ज्ञांकडून तीव्र टीका आणि विरोधही झाला. आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत नव्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षात ज्ञानरचनावाद आधारावर शिक्षण याची मोठी चर्चा झाली. आता भाषा आणि गणिताच्या समृद्धीकरणासाठी विशेषतः गणिताचार्य भास्कराचार्य गणित समृद्धीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने तयार केलेले एक संच ॲल्युमिनियमच्या पेटीमधून तालुकास्तरावर प्राप्त झाला आहे. याचा मूळ उद्देश प्रत्येक मुलास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आहे. अलीकडे राष्ट्रीय व राज्य स्तरावर झालेल्या पहाणी अहवालात पहिली ते आठवीतील मुलांची गणित व भाषा विषयाची प्रगती असमाधानकारक होती. म्हणूनच गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी विद्यार्थ्यासमोर गणित हा विषय साहित्यातून मांडणी करणे असा उद्देश ठेवण्यात आला आहे. हे साहित्य शास्त्रीय पद्धतीने गणितीय संकल्पना स्पष्ट करेल असा बनविण्यात आला आहे. त्याकरिता राज्यस्तरावर पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षकांना गणितात प्रगल्भ करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या संचाचा उपयोग कसा करावा याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण परिषदेने तयार केलेल्या एका संचाचा उपयोग वर्गातील सहा मुलांना होणार आहे. यात मणीमाळ असून शंभर प्लास्टिकचे मणी आहेत. एकक, दशक, शतक समजण्यासाठी प्लास्टिकचे ठोकळे देण्यात आले आहेत. नाणी आणि नोटा समजाव्यात म्हणून १ ते दोन हजार सारख्या दिसणाऱ्या नोटांचा उपयोग केला जाणार आहे. तसेच त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आयत या घटकांसाठी मॅचिंगसेट, गणितीय झाळी, संख्याकार्ड, जीओ बोर्ड, मीटर टेप, मणी दोरी, केसाला लावावयाचे पीन्स, पाट्या अशा साहित्याचा उपयोग केला जाणार आहे. 

संचाची वाहतूक शिक्षकांकडून
गणिताच्या समृद्धी करणासाठी ॲल्युमिनियमच्या बॉक्‍समध्ये शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे. हे साहित्य गेल्या महिन्यात तालुकास्तरावर दाखल झाले. मात्र याचे वितरण शाळेत झाले नाही. अखेर प्रत्येक शाळेतील शिक्षकाला या संचाची वाहतूक करावी लागली. काही स्वतःच्या वाहनातून काही भाड्याने वाहन करून हा संच शाळेपर्यत न्यावा लागत आहे.

Web Title: Students get set for mathematics development