शिकक्षकांसह विद्यार्थ्यांनी केली भात लावणी

अमित गवळे
शुक्रवार, 29 जून 2018

पाली (रायगड) : सध्या भात लावणीची कामे सुरू आहेत. ही सर्व माहिती विद्यार्थी पुस्तकातुन अभ्यासतात. मात्र पुस्तकात वाचलेल्या भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा यासाठी राजिप पायरीच्या वाडीचे शिक्षक कुणाल पवार यांनी विद्यार्थ्यांना शेतात नेऊन भात लावणी केली.

पवार यांनी विद्यार्थ्याना आपण शेतात लावणीसाठी जायचे का? असे विचारल्यावर सर्वच विद्यार्थी एकदिलाने तयार झाले. मग आर्यन नावाचा विद्यार्थी म्हणाला, सर आमच्या शेतात चला. शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता कडाळी या देखील सर्वांसोबत भात लावणीसाठी निघाल्या.

भात लावणी करत असताना लावणीची पद्धत-तंत्र, भात रोपांचे प्रकार, खते आदीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्वांनी मिळून भात लावणीचा आनंद घेतला. विद्यार्थी खूपच खूश होते. कारण त्यांनी पुस्तकात वाचलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.

Web Title: students learn rice farming in pali