नवघर राजिप शाळेतील विदयार्थी गिरवीणार संगणकाद्वारे शिक्षणाचे धडे

अमित गवळे
रविवार, 17 जून 2018

पाली(रायगड) : आश्रम ट्रस्ट (ग्रामीण इंग्रजी आणि संगणकिय शिक्षण सहकारी योजना) यांनी शुक्रवारी (ता.१५) नवघर राजिप शाळेला १५ संगणकाची अनोखी भेट दिली व संगणक कक्ष निर्माण केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेतच संगणक व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ज्ञानकन गिरविता यावे यासाठी ही भेट दिली आहे.

या संगणक कक्षात १५ संगणक व टच स्क्रीन स्मार्ट बोर्ड, आणि इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकविण्यासाठी बिएसी आयटी शिक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांनी आजचे युग हे स्पर्धेचे व संगणकीय युग असून लेखन वाचनाबरोबरच संगणक साक्षरता असणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

कॅप्टन रावसाहेब म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी बौध्दीक कौशल्याने परिपुर्ण असतात. येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आपली गुणवत्ता विकसीत करुन पुढे जाऊ शकतात. शाळेत अरुण होरा, कुंदन व्होरा, कॅप्टन रावसाहेब, सौ. राव आदिंच्या सहकार्यातून सुसज्य व अत्याधुनिक संगणक कक्षाची निर्मीती झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यालवलकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सुधागड गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी, पाली-सुधागड गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, केंद्रप्रमुख घनशाम हाके आदिंसह शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृध्द, लोकप्रतिनीधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Students from Navghar Rajip School will learn the lessons of learning through computer