राजिप धोंडसे शाळेतील विद्यार्थ्यांनी केला प्लास्टिक न वापरण्याचा निर्धार

अमित गवळे 
मंगळवार, 10 जुलै 2018

पाली - रा.जि.प.डिजिटल व टॅबलेट शाळा धोंडसेतील विदयार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी कागदी पिशव्या तयार केल्या. विदयार्थ्यांनी यावेळी प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला. तसेच बनविलेल्या या पिशव्या गावक-यांना वाटप केल्या.

पाली - रा.जि.प.डिजिटल व टॅबलेट शाळा धोंडसेतील विदयार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी कागदी पिशव्या तयार केल्या. विदयार्थ्यांनी यावेळी प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला. तसेच बनविलेल्या या पिशव्या गावक-यांना वाटप केल्या.

शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गावीत व सह शिक्षीका सिमा सिरसट यांनी कला, कार्यानुभव विषया अंतर्गत हा उपक्रम केला. त्यांनी मुलांना प्लाष्टिक पिशव्यांचे दुष्परीणाम सांगीतले. तसेच प्लास्टिक पर्यावरण व आरोग्याला कसे धोकादायक आहे हे समजावुन दिले.त्यामूळे विदयार्थी स्वतः पुढे येवून म्हणाले कि आम्ही प्लास्टीक वापरणार नाही व घरच्यांना सुध्दा वापरून देणार नाही. असे मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी सकाळला सांगितले. सर्व मुलांनी आनंदाने या उपक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर प्रत्येक पालकांना मुलांनी कागदी पिशवी दिली व प्लाष्टीक पिशव्यांचे दुष्परीणाम सांगीतले.

विदयार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव
रा.जि.प.डिजिटल व टॅबलेट शाळा धोंडसे तील विदयार्थ्याना भातशेती लागवड कशी करतात याचा अनुभव देण्यासाठी शेतात नेण्यात आले. विदयार्थी व शिक्षकांनी प्रत्यक्ष भात लागवड केली.लावणीसाठी चिखल करण्यासाठी बैलांचा व यंत्राचा वापर केला जातो हे विदयार्थ्यांनी पाहिले. प्रत्यक्ष एक तास मुले भात लावत होते.त्यानंतर देखिल "अजून काम करूया सर" असा आग्रह विदयार्थ्यांनी धरला. शाळेत आल्यावर मुलांनी भातशेती विषयी १० ते १५ ओळी माहीती लिहिली.

Web Title: The students of Rajap Dhondse have decided not to use plastic