भा. रि. प. बहुजन महासंघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

अमित गवळे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

भा. रि. प. बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मागासवर्गीय, ओबिसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर व वाढीव फीच्या विरोधात व्यापक स्वरुपाचे जनआंदोलन भारिपने छेडले अाहे. केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग (यु. जी. सी.) रद्द केला.

पाली (जि. रायगड) - भा. रि. प. बहुजन महासंघ सुधागड तालुक्याच्या वतीने पालीत पाचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली.

यावेळी भा. रि. प. बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मागासवर्गीय, ओबिसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर व वाढीव फीच्या विरोधात व्यापक स्वरुपाचे जनआंदोलन भारिपने छेडले अाहे. केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग (यु. जी. सी.) रद्द केला. विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांना या धोरणाचा मोठा फटका बसला. या धोरणाविरोधातही आंदोलन उभारले असल्याची माहिती मोरे यांनी दिली. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन असून आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी ध्येय उरी बाळगून ध्येयपुर्तीसाठी आवश्यक मेहनत घ्यावी. उच्चशिक्षण घेवून सर्वांगिण प्रगती साधावी असे आवाहन मोरे यांनी केले. यावेळी मंगेश वाघमारे, गोपीनाथ सोनावणे, अमित गायकवाड आदिंनी विचार मांडले. या कार्यक्रमास भा.रि.प बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, भा. रि. प. बहुजन महासंघाचे जिल्हा युवा सरचिटणिस गोपिनाथ सोनावणे, भा. रि. प. जिल्हा सचिव रमेश पवार, सुधागड तालुकाध्यक्ष अमित गायकवाड, सुधागड तालुका महिला अध्यक्षा सुरेखा जाधव, महिला सरचिटणीस अनुष्का जाधव, सुधागड तालुका युवक अध्यक्ष रितेश देशमुख, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सुधागड तालुका अध्यक्ष नरेश गायकवाड, लक्ष्मण वाघमारे, अजित सोनावणे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते व विदयार्थी व पालक उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Students were felicitated by the Bahujan Mahasangh