नाट्यरसिकांचा अंत पाहू नका : सुबोध भावे

 subodh bhave visited in ratnagiri kokan marathi news
subodh bhave visited in ratnagiri kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम अत्यंत देखणे झाले आहे. तुम्ही परवानगी द्या अगर देवू नका. इथे पहिला नाटक मीच करणार. माझ्याच नाटकाने सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन होणार अशी भूमिका डॉ. काशिनाथ घाणेकर यांची अजरामर भुमिका करणारे सुप्रसिद्ध कलावंत सुबोध भावे मांडली. नाट्यगृहाच्या उद्घाटनाला विरोध करणार्‍यांना भावे यांनी एका प्रकारे चपराक दिली आहे. 
भावे आपल्या नाटकाच्या प्रयोगासाठी दोन दिवस रत्नागिरीच्या दौर्‍यावर आहेत. रत्नागिरीला जाण्यापूर्वी त्यांनी सहकारी कलाकारांसह येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला भेट दिली.नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, ठेकेदार महेश कुलकर्णी, नाट्य संयोजक अविनाश जोशी, नगरसेवक आशिष खातू, सौ. रसिका देवळेकर आदींनी त्यांचे स्वागत केले.

राजकारण बाजूला ठेवून नाट्यगृहाचे उद्घाटन करा

नाट्यगृहाचे काम पाहून त्यांनी चिपळूण पालिका आणि नाट्यगृहाचे काम करणार्‍या कारागिरांचे कौतूक केले. चिपळूणचे नाट्यगृह मनाला भुरळ घाळणारे आहे. मी भारावून गेलो आहे. अत्यंत कल्पकतेने आणि देखणे असे नाट्यगृहाचे काम झाले आहे. आता नाट्यरसिकांचा अंत पाहू नका. लवकरात लवकर हे नाट्यगृह सुरू करा. अशी विनंती त्यांनी पालिकेला केली. सांस्कृतिक केंद्रातील डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंच पाहून ते भारावून गेले. आपल्या मोबाईलमधील कॅमेर्‍याने त्यांनी रंगमंचाचे फोटो काढून हे रंगमंच मोबाईलमध्ये संग्रहित केले.

पहिला प्रयोग मीच करणार

त्यांच्या सोबत शैलेश दातार, उमेश जगताप हे कलाकार होते. नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी येणार्‍या अडथळ्यांची माहिती नगराध्यक्षा सौ. खेराडे यांनी भावे यांना दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना भावे म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन हे नाट्यगृह सुरू करा. अशी माझी विनंती आहे. 15 मार्च ते 24 मार्च दरम्यान मला इथे प्रयोग करायचा आहे. तुम्ही उद्घाटन नाही केलात तरी पहिला प्रयोग मीच इथे करणार आणि माझ्या नाटकानेच सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन होईल. त्यानंतर 1 मेला नियोजन कार्यक्रमानूसार येथे नाटकाचा प्रयोग होईल. असे भावे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com