आपटा : बसमधील बॉम्ब सदृश्य वस्तु निकामी करण्यात यश

महेंद्र दुसार
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

अलिबाग - पेण आगारातून आपटा येथे मुक्कामी आलेल्या एसटी बसमध्ये बुधवारी (ता.20) रात्री 11 वाजता बॉम्बसदृश्य वस्तु आढळून आल्याने खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉड पथकाला घटनास्थळी तत्काळ दाखल होत बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. 

या बॉम्ब सदृश्य वस्तुमध्ये युरिया बेस्ड पावडर, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक सर्किटअसे साहित्य सापडले आहे. हे सर्व साहित्य फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. बॉम्ब सदृश्य वस्तु निकामी करण्याच्या प्रक्रियेवर जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर हे पूर्णवेळ लक्ष देवून होते. 

दरम्यान, ही बस पेण आगारातून पनवेल तालुक्यातील आपटा (एमएच, 14 बीटी 2724) बुधवारी रात्री 11 वाजता मुक्कामी आली होती. आपटा येथे बस थांबल्यानंतर वाहकांनी तपासणी करताना बसमध्ये एक कापडी पिशवी आढळून आली. यामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तु होती. चालकांने तत्काल रसायनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधत याबद्दल माहिती दिली. रसायनी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होत बस सुरक्षीत ठिकाणी उभी केली होती. त्यानंतर अलिबाग येथून आलेल्या बॉम्ब शोधक पथकाने ही बॉम्ब सदृश्य वस्तु निकामी करण्यात यश मिळविले. सुमारे 6 तासांच्या प्रयत्नानंतर 5 वाजण्याच्या सुमारास ही बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी केल्याचे सांगितल्यानंतर रायगड पोलिसांनी सुटकेचा निष्वाश टाकला. 

Web Title: Success in destroying things like a bomb in the bus