मेढा येथे आत्महत्या करणाऱ्या युवकाला वाचविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मालवण - शहरातील मेढा येथे गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण साळुंखे याची प्रकृती आता स्थिर असून त्याला वाचविण्यात डॉक्‍टरांना यश आले आहे. गळफास लावलेल्या अवस्थेतून उतरवीत त्याच्या प्राथमिक उपचार करणाऱ्या भूषण परब या युवकामुळेच भूषण याचा जीव वाचला आहे.

मालवण - शहरातील मेढा येथे गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण साळुंखे याची प्रकृती आता स्थिर असून त्याला वाचविण्यात डॉक्‍टरांना यश आले आहे. गळफास लावलेल्या अवस्थेतून उतरवीत त्याच्या प्राथमिक उपचार करणाऱ्या भूषण परब या युवकामुळेच भूषण याचा जीव वाचला आहे. त्यामुळे भूषण परबवर शहरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मेढा येथील भूषण साळुंखे या युवकाने काल रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्याचे वडील भास्कर साळुंखे यांच्या लक्षात येताच त्यांनी ओरड मारली असता तेथे उपस्थित असलेल्या भूषण परब या युवकाने घरात धाव घेत भूषण याला खाली उतरवीत त्याच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार केले. त्यानंतर मंदार परब, उदय खराडे या मित्रांच्या सहकार्याने त्याला दुचाकीवरून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉ. बालाजी पाटील, डॉ. अजित लिमये, डॉ. मालविका झांटये यांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून गोवा बांबुळी येथे नेत त्याच्यावर पुढील उपचार झाले. वेळेत उपचार झाल्यामुळेच भूषण साळुंखे या युवकाचा जीव वाचला. 

भूषण साळुंखे याला जीवदान देणारा भूषण परब हा नुकताच अंदमान येथून स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेऊन परतला होता. या प्रशिक्षणामुळेच त्याला भूषण याला वाचविण्यात योगदान देता आले. भूषण याने धाडस केले नसते तर भूषणचा जीव वाचला नसता. त्यामुळे भूषणचा जीव वाचविण्यासाठी भूषणने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल शहरात त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

Web Title: Success in saving life of a young man who committed suicide

टॅग्स