राजापूर : लाल मातीमध्ये फुलला उसाचा मळा

वर्षागणिक ‘एक पाऊल पुढे’ ; ८० शेतकऱ्‍यांनी केली लागवड

Sugarcane in red soil
Sugarcane in red soilesakal

राजापूर :घाटमाथ्यावरील काळ्या मातीमध्ये रुजवात होणाऱ्या उसाचा गोडवा कोकणातील लाल मातीमध्ये खुलत चालला आहे.ऊस लागवडीच्या क्षेत्रामध्ये वर्षागणिक होत असलेली लक्षणीय वाढ पाहता तो अधिकच वृद्धिंगत होताना दिसत आहे. भातशेतीकडे काहीसे दुर्लक्ष करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांचा ऊस लागवडीकडे वाढता कल पाहता त्यातून कोकणच्या कृषीक्षेत्राला भविष्यामध्ये नव्या ओळखीचा वेगळा आयाम मिळण्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.

घाटमाथ्याच्या तुलनेमध्ये कोकणातील ऊस लागवडीखालील क्षेत्र कमी असले तरी, त्याची वर्षागणिक वाटचाल ‘एक पाऊल पुढे’ दिसत आहे. त्याला पीक विम्याचे कोंदण मिळाल्यास उसाचा गोडवा अविट होण्यास मदत होईल हे मात्र, निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com