मालवण येथे आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

मालवण येथे आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

मालवण - येथे पडवळ यांच्या बंद घराच्या पाठीमागे वायरच्या साहाय्याने गळफास लावून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विश्‍वास माधव साळवी (वय - 60 रा. पोस्ट कार्यालयानजीक) असे त्यांचे नाव आहे. शहरातील जुन्या काळातील रक्त तपासणीस म्हणून ते परिचित होते. त्यामुळे शहर परिसरात गेल्या काही महिन्यात सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र हा चिंतेचा विषय बनला आहे. 

याबाबतची माहिती अशी  शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणारे विश्‍वास साळवी हे जुन्या काळातील रक्त तपासणीस म्हणून ओळखले जात. ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. शिवाय त्यांना दारूचे व्यसनही होते. काल मध्यरात्री त्यांनी घरालगत असलेल्या पडवळ यांच्या बंद घराच्या पाठीमागील जागेत वायरच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. दारूच्या नशेत आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती त्यांचा मुलगा चंद्रकांत ऊर्फ चंदू साळवी याने येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com