गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

विक्रांतने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून घराच्या पडवीच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे

रत्नागिरी - शहराजवळील खारवीवाडा-कासारवेली येथील एका तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

विक्रांत काशिनाथ लाकडे (वय 21, रा. खारवीवाडा-कासारवेली) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. विक्रांतने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून घराच्या पडवीच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. इंदुलकर करत आहेत.

Web Title: suicide in ratnagiri