आंगणेवाडी, उन्हाळी सुटीसाठी जादा रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कणकवली - आंगणेवाडी यात्रा, होळी, गुढीपाडवा तसेच उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या धावणार आहेत. तसेच नागपूर, जबलपूर येथूनही गोव्यापर्यंत जादा रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली. या विशेष गाड्या २८ फेब्रुवारी ते ८ जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. गेल्या महिन्यात नागपूर-मडगाव या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे नागपूर गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या.

कणकवली - आंगणेवाडी यात्रा, होळी, गुढीपाडवा तसेच उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या धावणार आहेत. तसेच नागपूर, जबलपूर येथूनही गोव्यापर्यंत जादा रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली. या विशेष गाड्या २८ फेब्रुवारी ते ८ जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. गेल्या महिन्यात नागपूर-मडगाव या फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे नागपूर गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या.

अजनी-मडगाव ही गाडी ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत प्रत्येक सोमवारी धावणार आहे. अजनी (नागपूर) - मडगाव (०१११९) ही गाडी अजनी येथून सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि मडगावला ती दुसऱ्या दिवशीच्या रात्री ९.३० वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ४ एप्रिलपासून दर मंगळवारी रात्री १०.४५ वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता ती नागपूरमधील अजनी स्थानकावर पोचल. १८ डब्यांची ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सावंतवाडी, थीवी या स्थानकांवर थांबणार आहे. 

पुणे ते तिरुनेलवेली (तमिळनाडू) धावणारी विशेष गाडी २ एप्रिल ते ६ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पुण्याहून दर रविवारी दुपारी ४.१५ वा. सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता तिरुनेलवेलीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास तिरुनेलवेलीहून सकाळी ७.२० वा. सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता तो पुण्याला संपेल. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावताना रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच मडगाव स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला १५ एलएचबी कोच जोडण्यात येणार आहेत.

पुणे-एर्नाकुलम ही गाडी ६ एप्रिल ते ८ जून या कालावधीत प्रत्येक गुरुवारी धावणार आहे. ६ एप्रिलपासून ही गाडी  पुण्याहून दुपारी  ४.१५ वा. सुटेल आणि केरळमध्ये एर्नाकुलमला दुसऱ्या दिवशी रात्री ८.१५ वा. पोहोचेल. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थीवी, मडगाव या  स्थानकांवर थांबणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही गाडी २८ फेब्रुवारीला धावणार आहे. एलटीटी येथून पहाटे ५.३३ वाजता निघालेली ही गाडी सावंतवाडी स्थानकात दुपारी तीन वाजता पोहोचणार आहे. तर त्याच दिवशी सावंतवाडी स्थानकातून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि एलटीटी स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ३.२५ वाजता पोहोचणार आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात ही गाडी थांबणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही आंगणेवाडी स्पेशल गाडी १ मार्च रोजी एलटीटी येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सावंतवाडी स्थानकात सायंकाळी ७.२० वाजता पोहोचणार आहे.  तर परतीची सावंतवाडी-एलटीटी ही गाडी २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी येथून सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.२५ वाजता पोहोचणार आहे. 

मुंबई सीएसटी ते सावंतवाडी ही गाडी १ मार्च रोजी धावणार आहे. सीएसटी स्थानकातून १२.२० वाजता निघालेली ही गाडी सावंतवाडीत सकाळी दहा वाजता पोहोचणार आहे. तर त्याच दिवशी सावंतवाडी येथून सकाळी ११.१५ वाजता निघालेली ही गाडी सीएसटी स्थानकात रात्री १०.४५ वाजता पोहोचणार आहे. 

मुंबई-सीएसटी ते सावंतवाडी ही गाडी २ मार्च रोजी सीएसटी स्थानकातून मध्यरात्री १२.२० वाजता सुटणार असून सावंतवाडीत दुपारी १२ वाजता पोहोचणार आहे. तर परतीची सावंतवाडी-सीएसटी ही गाडी सावंतवाडी स्थानकातून ३ मार्च रोजी सकाळी ७.१० वाजता सुटेल आणि सीएसटी स्थानकात सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचणार आहे. या सर्व गाड्यांना सिंधुदुर्गातील प्रमुख स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

Web Title: Summer holidays for additional train