राष्ट्रवादीच्या विजयात शिवसेनेच्या निष्ठावंतांचा वाटा: तटकरे

Sunil Tatkare
Sunil Tatkare

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्ञात अज्ञात शक्तींसह निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेल्या आशिर्वादामुळे अनिकेतला दैदीप्यमान यश मिळालं, असं सांगत शिवसेनेची मतं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली, यावर सुनील तटकरे यांनी शिक्कामोर्तब केलं. ते रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना तटकरे यांनी गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या शेकाप, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, मनसे यांचे आभार व्यक्त करत त्यांनी ज्ञात अज्ञात शक्तींसह निष्ठावंत शिवसैनिकांचे विशेष आभार मानले. आणि शिवसेनेच्या गोटातूनही मतदान झाल्याच्या वृत्ताला त्यांनी अधिकृत दुजेरा दिला.

दलबदलू उमेदवार ना गीतेंनी पुढे आणल्याने हा उमेदवारच निष्ठावान शिवसैनिकांना रुचलेला नव्हता. त्यामुळेच शिवसेनेतील सुज्ञ मतदारांनी अनिकेतला मतदान करून गीतेंना एकप्रकारे चपराक लागवल्याचं तटकरे यावेळी म्हणाले. गीतेंचा हा निर्णय त्यांच्या अंगलट आला असे सांगून ते पुढे म्हणाले, की ना गीतेंनी राजीव साबळेंचा बळी दिला आहे. या निवडणुकीत प्रतिकूल वातावरण होत. अशा वातावरणात ज्ञात अज्ञात शक्ती तसेच निष्ठवंत शिवसैनिक यांनी विजयासाठी हातभार लावला.

भाजपच्या सहकार्याबाबत त्यांना छेडलं असता ज्ञात अज्ञात शक्तीमध्ये भाजपचाही हातभार असू शकतो असं सांगून या निवडणुकीत सर्वच पक्ष राष्ट्रवादीबरोबर असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यावर सर्वच ठिकाणी भाजपने विरोधाची भूमिका घेतली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी फारकत घेत राष्ट्रवादीला मदत केल्याचं स्पष्ट केले. 

दरम्यान निरंजन डावखरे यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी असल्याचं सांगत कोकण पदवीधर मतदार संघचया निवडणुकीत राष्ट्रवादी संपूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com