मराठा क्रांती पक्ष राज्यात सक्षम पर्याय ठरेल - सुरेशदादा पाटील

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

रत्नागिरी - सत्ताधारी व विरोधकांनी निवडणुकीत मराठा समाजाचा उपयोग करून घेतला; पण आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा व्होट बॅंकेची बांधणी आतापासून करत आहोत. दिवाळी पाडव्याला स्थापन होणारा पक्ष महाराष्ट्रात सक्षम तिसरी आघाडी पर्याय ठरेल, असा दावा मराठा क्रांती संघटनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी केला. मराठा भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘आगामी निवडणुकीत युवा व नव्या नेतृत्वाला तिकीट मिळेल. प्रस्थापित पक्षांमधील नेतेमंडळींना मराठा समाज जागा दाखवेल. निवडणुकीसाठी पैसा समाजातील लोक व मराठा उद्योजक देतील. राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत लाख लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दबाव गट निर्माण करण्यासाठी पक्ष स्थापन होणार आहे. रायरेश्‍वर मंदिरात १०० जणांची कोअर कमिटी व प्रत्येक जिल्ह्यातील मिळून पाच हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची घोषणा करू.’

फूट पाडण्याचा प्रयत्न 
मराठा समाजात आतापासून फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केला आहे. त्यासाठी वॉर रूमसुद्धा काम करत आहे. मात्र संघटना राज्याचा दौरा करत आहे. कोल्हापूर येथे पहिली सभा झाली. कणकवली, रत्नागिरीत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.

या वेळी भरत पाटील, विठ्ठल पेडणकर, चंद्रकांत सावंत, केशवराव इंदुलकर, मोहन मालवणकर, परेश भोसले, मधुकर दळवी, वैशाली जाधव, सिंधुताई शिंदे, ॲड. भोसले, जयवंत विचारे, विलास सावंत, सुभाष सावंत आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Sureshdada Patil comment