अपना घरला मंत्र्यांची अचानक भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पणजी : महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी अपना घरला अचानक भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. अपना घरमधील एका अधिकाऱ्याने आयोजित केलेल्या पार्टीचा सुगावा मंत्र्यांना लागल्याने याबाबतची पडताळणी करण्यासाठीची अचानकपणे ही भेट देण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजता अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी अपना घरमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले असून ही पार्टी अपना घरामधीलच एका अधिकाऱ्याने ठेवली असल्याचा व्हॉट्‌सअप संदेश व्हायरल केला होता. या पार्टीच्या जेवणासाठीची जबाबदारी अपना घरमधील आचाऱ्याला देण्यात आली असल्याची माहितीही या संदेशात होती. मात्र कालांतराने सुमारे दीड वाजताच्या सुमारास ही पार्टी रद्‌द झाल्याचेही अॅज. रॉड्रिग्ज यांनी संदेशाच्या माध्यमातून कळविले पण अपना घरमध्ये होणाऱ्या अशा प्रकरणांवर कारवाई करण्यासाठीचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले. मिळालेल्या या माहितीची शहानिशा करण्यासाठी मंत्री राणे यांनी थेट अपनाघर गाठले. 

ही भेट अचानकपणे दिल्याने सर्वच कर्मचारी आश्‍चर्यचकित झाले. पण त्यांच्याशी संवाद साधून अपना घरमधील परिस्थिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. माझ्यासमोर असणाऱ्या ध्येयांमध्ये मी अपना घरची प्रगती करण्यासाठीचे नियोजनही ठेवले असून येत्या काही दिवसातच अपना घरला एक वेगळे स्वरूप प्राप्त होणार असल्याचे मंत्री राणे यावेळी म्हणाले. 

Web Title: A surprise visit to ministers of apana ghar

टॅग्स