विधानसभेसाठी मी निश्‍चिंत - सूर्यकांत दळवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

दाभोळ - नुकतेच दापोली दौऱ्यात रामदास कदम यांनी दळवी हे माझे मित्र असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने त्यांनी माझ्या मताला पाठिंबा दिला. आता पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मी निश्‍चिंत झालो आहे. यापुढच्या काळात दापोली शिवसेनेमध्ये आलेली मरगळ झटकून गद्दारांना नक्‍कीच धडा शिकवू, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, माझे मित्र रामदास कदम यांनी माझ्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीला हिरवा कंदिल दाखवला. दळवी व रामदास कदम यांच्यात गेले काही वर्षे मतभेद होते. आपल्या पराभवाला रामदास कदमच जबाबदार असल्याचा उल्लेख दळवी यांनी वारंवार केला होता. त्याचप्रमाणे रामदास कदम यांना ‘मेरे आंगने मे तुम्हारा क्‍या काम है’ असा प्रश्‍न जाहीरपणे विचारून खळबळ उडवून दिली होती. 

दळवी म्हणाले की, रामदास कदम व मी पूर्वीपासूनच शिवसेनेत कार्यरत आहोत. त्यांना तिकीट मिळावे, म्हणून मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ चर्चा केली. त्यांचा राजकारणात प्रवेशदेखील माझ्यामुळेच झाला. चेंबूरमधून जाताना अनेक वेळा रामदासभाई मला सोबत घेऊन जात. दापोली मतदारसंघातून मी व खेड मतदारसंघातून रामदास कदम असे दोन शिलेदार विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी 
होत होतो. 

गुहागर विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांचा पराभव झाल्यावर त्यांना विधानपरिषदेवर शिवसेनेकडून पाठविण्यात आले. 

मी त्यांना माझी बाजू सांगितली
मध्यंतरी मातोश्रीवरून आलेल्या निरोपामुळे कदमांनी माझी भेट घेण्याचे निश्‍चित केले. त्याप्रमाणे काही प्रतिनिधी चर्चेसाठी माझ्याकडे पाठवले. मी त्यांना माझी बाजू सांगितली. त्यानंतर कदमांनी माझ्याकडे संपर्क केला नाही, असे दळवी यानी सांगितले.

Web Title: Suryakant Dalvi comment