नेपाळी तरुण खलाशाचा संशयास्पद मृत्यू, खून झाल्याचा संशय ; जेटीवर सापडला मृतदेह

राजेश शेळके 
Monday, 2 November 2020

सुनीलचा घातपात झाल्याच्या संशयावरून भाऊ प्रकास चौधरी (रा. लांजा) याने शहर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली.

रत्नागिरी - शहरातील मिरकरवाडा येथे नेपाळी तरुण खलाशाचा खून झाल्याचा संशय आहे. त्याच्या अंगावरील जखमा मृत्यूपुर्वीच्या असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा अपघात असण्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषांगाने पोलिसांनी चळीस ते पन्नास जणांकडे चौकशी केली. मात्र काहीच निष्पन्न झालेले नाही. 

मृताचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
 सुनील जितलाल चौधरी (वय 24, रा. कुवे लांजा) असे खून झालेल्या खलाशाचे नाव आहे. शनिवारी (ता.31) सकाळी नऊच्या सुमारास जेटीवर त्याचा मृतदेह सापडला. सुनील हा मिरकरवाडा येथील मच्छीमार हनिफ वस्ता यांच्या बोटीवर ख लाशी म्हणून कामाला होता. शुक्रवारी (ता.30) रात्री सुनील हा शौचालयाला जातो, असे आपल्या सहकार्‍यांना सागून गेला. दरम्यान दुसर्‍या दिवशी सकाळी जेटी किनारी पाण्यात सुनीलचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन केले. तेव्हा सुनील याच्या डोक्यावर व छातीवर झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनात पुढे आले.

सुनीलचा घातपात झाल्याच्या संशयावरून भाऊ प्रकास चौधरी (रा. लांजा) याने शहर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात गुन्हेगाराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील याचा खून कशावरून आणि कोणी केला असावा,याचा तपास शहस पोलिस करत आहेत.

हे पण वाचाराज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आधीच फेटाळण्याचं फिक्स; मुश्रीफांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सुनीलच्या अंगावरील जखमा मृत्यूपुर्वीच्या आहेत. या संशयावरून आम्ही खबरदारी म्हणून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने अनेकांची चौकशी केली. मात्र काहीच हाती लागलेले नाही. सुनीलच्या जखमा पाहून तो पडून अपघात झाला असल्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही शक्यता गृहित धरून आम्ही तपास सुरू ठेवला आहे.

-अनिल लाड, शहर पोलिस निरीक्षक
 

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspicious death of a young Nepali sailor in ratnagiri