तो नेहमी घराच्या शेजारी खेळण्यासाठी जायचा आणि आज तो साचलेल्या पाण्यात गेला अन्....

Suyash Sri Devji case by drowning case in vengurla
Suyash Sri Devji case by drowning case in vengurla

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ-वेळागर येथे आज  येथील सुयश श्री देवजी हा अडीच वर्षीय मुलगा घरा शेजारील साचलेल्या पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यु झाला.


घराच्या शेजारी खेळण्यासाठी गेलेल्या सुयशचा साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक वेळा सुयश बाजूच्या घरी जात होता . सकाळी आई कामाला गेल्यावर हा घरातून बाहेर पडला. बराच वेळ तो दिसला नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी तो पाण्यात आढळून आला.

या दुर्दैवी घटनेमुळे देवजी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, काका, काकी, आजी असा परिवार आहे.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com