आंब्रड विभागात स्वाभिमानला खिंडार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मार्च 2019

कुडाळ - आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, आंब्रड या गावातील लोकप्रतिनधींसह स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आंब्रड विभागात शिवसेनेने स्वाभिमानला खिंडार पाडले आहे.

कुडाळ - आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, आंब्रड या गावातील लोकप्रतिनधींसह स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आंब्रड विभागात शिवसेनेने स्वाभिमानला खिंडार पाडले आहे.

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाला. यात जांभवडे माजी सरपंच चिंतामणी मडव, भरणी माजी उपसरपंच विशाल मेस्त्री, राजू परब, कुपवडेतील राणेसमर्थक पी. डी. सावंत, आंब्रड माजी सरपंच विकास राऊळ, अनंत परब, बाळा गुरव, काशीराम घाडीगांवकर या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

शिवसेना आंब्रड विभागाचा जाहीर संकल्प मेळावा काल (ता.2) आंब्रड बाजारपेठेत झाला. यावेळी खासदार राऊत म्हणाले, ""आम्ही कधीच गावच्या विकासात पक्षभेद मानले नाहीत. आबा मुंज यांच्या मागणीवरून आंब्रड ग्रामपंचायतीसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 12 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. काहीजण मुख्यमंत्रीपदासाठी अनेक पक्षांची दार ठोठावत आहेत; मात्र मंत्री पदासाठी आमचा जन्म मुळीच नाही. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत ग्रामपंचायत सदस्याच्या दुकानात घुसून हैदोस घालत आहेत. एखादा शिवसेनेत प्रवेश करतो म्हणून त्याला मारहाण होत असेल तर ते शिवसेना कधीच खपवून घेणार नाही. नारायण राणे यांच्या कारकिर्दीत प्रलंबित असलेले सोनवडे घाट, आनंदवाडी बंदर, अरूणा प्रकल्पासाठी भरघोस निधी आम्ही मंजूर करून आणला आहे. आपल्या चिरंजीवांसाठी नारायण राणे यांनी नरडवे धरणाची उंची वाढवून तेथे विद्युत प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला. कणकवलीत आता कचरा प्रकल्प राबवून कणकवलीला खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न नितेश राणे करत आहेत; मात्र तसे आम्ही मुळीच होऊ देणार नाही.''

यावेळी आमदार नाईक म्हणाले, ""याआधीचे खासदार, आमदार किती वेळा या मतदार संघात आले व किती प्रश्‍न सोडवले हा एक प्रश्‍नच आहे. जिल्हा बॅंक अध्यक्ष सावंत यांनी निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने व तरुणांना नोकरीचे आमिष पूर्ण करु शकले नसून जनता याचा जाब नक्कीच त्यांना विचारेल.''

यावेळी राजू गुरव, अनिल गुरव, देवीदास गुरव, सुनील गुरव, प्रकाश रायकर, सदानंद राणे, सतीश सावंत, सिद्धेश सावंत, विकास परब, राजेंद्र परब, रामचंद्र परब, प्रथमेश सावंत, निखिल सावंत, विजय परब, अमीनेश सावंत, रामचंद्र तेरसे, रामचंद्र साटम, दिलदार घाडीगांवकर, विकास घाडीगांवकर, अभिषेक घाडीगांवकर, राजू परब, विशाल मेस्त्री, सुधीर मडव, लक्ष्मण मडव, प्रफुल्ल मडव, नंदकिशोर मडव विनायक ठोकरे, अशोक मडव यांसह 200 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख, सुनील वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक सचिन काळप संदीप म्हाडेश्वर, नागेश नाईक, नितीन सावंत, उप तालुका प्रमुख महेश सावंत, विभाग प्रमुख दिनकर परब, निशांत तेरसे, सागर वाळके, शेखर परब, बाबा मेस्त्री, सचिन कदम, सुशील परब, संकेत पांगम, संदीप बागवे, प्रिया परब, गितेश सावंत, विजय परब, बाळू पारकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhiman activists enter in Shivsena in Ambrad region