मालवण रूग्णालय प्रश्नी स्वाभिमानचा 23 ला जनआक्रोश 

मालवण रूग्णालय प्रश्नी स्वाभिमानचा 23 ला जनआक्रोश 

मालवण - येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कुरिअर सेवेप्रमाणे इतरत्र पाठविले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासनापलिकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. रुग्णांची पिळवणूक करण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करत असल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जाग आणण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने येत्या 23 ला ग्रामीण रुग्णालयासमोर जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा सरचिटणीस महेश जावकर यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. श्री. जावकर म्हणाले, ""येथील ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. शहरासह परिसरातून येणाऱ्या रुग्णांना कुरिअर सेवेप्रमाणे इतरत्र उपचारासाठी पाठविले जात आहे. मागील वर्षात पर्यटकांच्या बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. यावेळी पालकमंत्री, आमदारांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देत अत्यावश्‍यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देऊ, असे सांगितले होते. प्रत्यक्षात याची कार्यवाही झालीच नाही. रुग्णांची पिळवणूक करण्याचे काम या नेतेमंडळींकडून होत आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या या राज्यकर्त्यांना जाग आणण्यासाठीच ग्रामीण रुग्णालयासमोर जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे.'' 

ग्रामीण रुग्णालयास नारायण राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केले. त्याला शासनाची मंजूरीही मिळाली. मात्र गेल्या चार वर्षात याची कोणतीही कार्यवाही शासनाकडून झाली नाही. वर्ग एक, दोनची पदे भरण्याची कार्यवाही झालेली नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद रिक्त असल्याने रक्तपेढीचे युनिटही मंजूर होऊ शकत नाही, असेही जावकर यांनी बोलून दाखवले. 

श्री. केणी म्हणाले, ""जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यातील रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असताना मालवणवरच अन्याय केला जात आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांसह अन्य तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती केली जात नाही. तालुक्‍याची आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. 

रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर 
रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागतात. कर्मचारी वसाहतीचे कामही संथगतीने सुरू आहे. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांसह अन्य वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप श्री. जावकर यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com