‘स्वाभिमान’ने सावंतवाडीचा उमेदवार जाहीर करावा

‘स्वाभिमान’ने सावंतवाडीचा उमेदवार जाहीर करावा

वेंगुर्ले - तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मासिक बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी वेंगुर्ले - सावंतवाडी - दोडामार्ग मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून अनेकांची नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नाव तत्काळ पक्षाने जाहीर करावे, अशी मागणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.

तालुका स्वाभिमान पक्षाची मासिक सभा अध्यक्ष विष्णुदास ऊर्फ दादा कुबल यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, नीलेश सामंत, जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, महिला तालुकाध्यक्षा सारिका काळसेकर, वसंत तांडेल, जयंत मोंडकर, नाथा मडवळ, ज्ञानेश्वर केळजी, नगरसेविका शीतल आंगचेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर, पप्पू परब, तुषार साळगावकर, समीर कुडाळकर, सायमन आल्मेडा तसेच भूषण सारंग, मनवेल फर्नांडिस, नितीन चव्हाण, मारुती दौडशानहट्टी, भूषण आंगचेकर, सुजाता देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्‍यातील विकासकामांवर चर्चा करताना सध्या शहरात विजेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यावरची चर्चा झाली. तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणाही व्हेंटिलेटरवर असून त्याबाबत आवाज उठविण्याचे ठरले. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यास पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना तळागळात जाऊन पक्षवाढीबरोबर उमेदवाराच्या प्रचाराला सुरवात करता येणार आहे. त्यामुळे उमेदवाराचे नाव पक्षाने जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com