ओझरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

राजापूर - 'जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधावी'', असे प्रतिपादन सभापती सोनम बावकर यांनी केले.

राजापूर - 'जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधावी'', असे प्रतिपादन सभापती सोनम बावकर यांनी केले.

पंचायत समिती आणि ओझर येथील विद्यावर्धिनी ओझर पंचक्रोशी संचालित माध्यमिक विद्यामंदिरतर्फे आयोजित 42 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन सोनम बावकर यांच्या हस्ते झाले. या वेळी उपसभापती उमेश पराडकर, विद्यावर्धिनी ओझर पंचक्रोशी संस्थेचे अध्यक्ष विलास रेगे, उपसरपंच गुणाजी बेहरे, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंकी, शाळा समितीचे अध्यक्ष नजीर टोले, सचिव सीताराम जाधव, पोलिसपाटील विलास कुर्ले, इब्राहिम लांजेकर, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री लाड, नलिनी शेलार, महंमद अली वाघू, डॉ. महेंद्र मोहन, मोहन सरखोत, मुख्याध्यापक विलास कोलते आदी उपस्थित होते.

उद्‌घाटनाप्रसंगी गणित विषयामध्ये योगदान देणाऱ्या तालुक्‍यातील शिक्षकांसह जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले शिक्षक हिदायत भाटकर आणि आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त भू शाळेला गौरविण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रतिकृती दालनांचे उद्‌घाटन झाले. सायंकाळी विज्ञान प्रतिकृती दर्शन, प्रश्‍नमंजूषा आणि विज्ञान नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. गजानन पळसुलेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या 84 प्रतिकृती आणि शिक्षकांच्या लोकसंख्या व शैक्षणिक साहित्य निर्मितीअंतर्गत 200 प्रतिकृती मांडल्या आहेत. विविध प्रतिकृतींची मान्यवरांनी पाहणी केली.

Web Title: tahsil lavel science exhibition inaugurated in ozar