आरोग्याबाबत मोकळपणाने बोला - दिशा दाभोळकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

चिपळूण - महिला कुटुंबाचा कणा आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना त्यांचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. महिला सुदृढ राहिल्या तरच कुटुंब सुदृढ राहील. म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. आरोग्य समस्येविषयी मोकळेपणाने बोलले तर नैराश्‍य टाळता येते. किमान आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलून नैराश्‍याला दूर ठेवा, असे मत जिल्हा परिषद सदस्या सौ. दिशा दाभोळकर यांनी खेर्डीतील आरोग्य तपासणी शिबिरात व्यक्त केले.

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून तालुका आरोग्य विभाग व ‘दै. सकाळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने खेर्डी दातेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. एकमध्ये खास महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला खेर्डीच्या सरपंच सौ. जयश्री खताते, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, आरोग्य विस्तार अधिकारी किशोर सोनवणे, आरोग्य सहायक मनोहर तायडे आदी उपस्थित होते. सरपंचांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. सौ. दाभोळकर म्हणाल्या की, धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी आपल्या आरोग्याबाबत नि:संकोचपणे डॉक्‍टरांशी बोलले पाहिजे. मोकळपणाने समस्या मांडल्या, तर त्यावर मात करता येईल. या प्रक्रियेतून नैराश्‍यदेखील कमी होईल. 

श्री. ठसाळे म्हणाले की, महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करायला हवी. यातून त्या आरोग्यदृष्ट्या सजग होतील. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य दिनानिमीत्त ‘चला बोलू या, नैराश्‍य टाळू या’ हे घोषवाक्‍य जाहीर केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती महिलांना देण्यात आली. रक्तदाब,  रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन, आरोग्य तपासणी करण्यात आली. बालकांना लसीकरण करण्यात आले. 

कार्यक्रमाला ‘सकाळ’चे पांडुरंग साळवी, नागेश पाटील, अडरे प्राथमिक केंद्राच्या आरोग्य सहायक अस्मिता सावंत, खेर्डी आरोग्य सेविका सस्मिता सावंत, आरोग्य सेवक सचिन लंबे, मुख्याध्यापक श्री. खाडे, खेर्डीतील सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Web Title: Talk about health free mind