महाराष्ट्राची आयकॉन म्हणून कोकण कन्येन उमटवली मोहर

tanvi bavdhankar 2nd rank in maharashtra icon in ratnagiri fashion show
tanvi bavdhankar 2nd rank in maharashtra icon in ratnagiri fashion show

गुहागर (रत्नागिरी) : पुण्यातील दी कलिनन या संस्थेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र आयकॉन २०२० या स्पर्धेत गुहागरमधील तन्वी गजानन बावधनकर ही द्वितीय क्रमांकाची (सेकंड विनर) विजेती ठरली. तसेच फोटोजनीक फेस ॲवाॅर्डने तन्वीला सन्मानित केले. यामुळे गुहागरच्या या युवतीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्‍वावर महाराष्ट्र आयकॉनची मोहर उमटली आहे. दि कलिनन ही संस्था पुण्यात फॅशन शोचे आयोजन करणारी संस्था आहे.

दी कलिनन या संस्थेने स्पर्धेकरीता ऑनलाइन अर्ज मागविले होते. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तन्वीने हा अर्ज भरला होता. महाराष्ट्रातील ६० जणांनी यात सहभाग घेतला. त्यांच्याकडून आलेल्या माहितीच्या आणि फोटोंच्या आधारावर संस्थेने स्पर्धेसाठी ३० जणांची निवड केली. या ३० स्पर्धकांना फॅशन डिझाईनमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या रॅम्प वॉकसाठी बोलावले.

रॅम्प वॉकच्या परीक्षणातून २० जणांची निवड पुढील स्पर्धेसाठी झाली. प्रश्नोत्तरांची फेरी ऑनलाइन झाली. त्यामधून १० स्पर्धक निवडले. या १० स्पर्धकांना विविध पोशाखातील आणि विविध पोझमधील फोटो पाठविण्यास सांगितले. पोझ आणि ड्रेसची निवड संस्थेने केली होती. फोटो आधारे परीक्षकांनी संपूर्ण स्पर्धेचे व्हिडिओ परीक्षण केले. त्यानंतर विजेत्यांची नावे निश्‍चित झाली. कोथरुड येथे पारितोषिक वितरण झाले.

गुहागरमधील तन्वी बावधनकरला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आणि बेस्ट फोटोजनीक फेसचा ॲवार्ड मिळाले. तन्वी अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण झाल्यावर पुण्यात नोकरी सांभाळून बी. ई. आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे.

"माझी ही पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे प्रश्नोत्तर, रॅम्पवॉक याबद्दल फार काही माहिती नव्हते. माध्यमातून माहिती घेऊन तयारी केली. पहिल्याच स्पर्धेत क्राऊन मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आहे."

- तन्वी बावधनकर

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com