आंबोली मुख्य धबधब्यावर स्थानिकांकडूनही कर वसुली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 सप्टेंबर 2018

आंबोली - येथील घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटन कर वनविभाग व पारपोली वनसमिती मार्फत घेताना स्थानिकांकडून कर घेण्यात येत आहे. याबाबत चौकुळ माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी लक्ष वेधले. याचा वनक्षेत्रपाल यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

येथील घाटातील धबधब्यावर पारपोली वनसमिती कर आकारणी करते. याबाबत चौकुळ, आंबोली आणि गेळे येथील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. गेली दोन वर्षे येथे पर्यटकांबरोबर स्थानिकांकडूनही कर वसुली केली जात आहे. हा धबधबा वन खात्याच्या अखत्यारीत असल्याने वन विभागाने स्थानिकांकडून कर घेण्याबाबत लेखी खुलासा करावा, अशी मागणी श्री. गावडे यांनी येथील वनक्षेत्रपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपवनसंरक्षक यांना निवेदनाची प्रत व आंबोली, चौकुळ, गेळे ग्रामपंचायतीला दिली आहे. निवेदनावर चौकुळ उपसरपंच विलास गावडे यांनी देखील सही केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax recoveries from local residents also on Amboli main waterfall