टीडीएसची रक्कम ‘तिलारी’तून देणार - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

दोडामार्ग - तिलारी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची पाटबंधारे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत भेट घडवून आणली आणि टीडीएस कपातीसंदर्भात 
चर्चा केली.

श्री. महाजन यांनी गोवा शासनाकडून टीडीएसपोटी कपात केलेली तिलारी प्रकल्पग्रस्तांची रक्कम महाराष्ट्र शासन तिलारीच्या खर्चातून देईल, अशी ग्वाही दिली. कंट्रोल बोर्डाच्या बैठकीआधी श्री. केसरकर व प्रकल्पग्रस्तांनी श्री. महाजन यांची भेट घेतली.

तिलारी प्रकल्पाचा सुरवातीचा अंदाजित खर्च ४५ कोटी होता. आता तो सुमारे दोन हजार कोटींवर पोचला आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी पाच टक्के रक्कम विस्थापितांसाठी, सोयी सुविधांसाठी खर्च करावी, असे शासकीय निर्देश आहेत. आतापर्यंत सुमारे सव्वादोन टक्के रक्कमच खर्च करण्यात आल्याचे कालच्या चर्चेदरम्यान पुढे आले होते. त्यामुळे त्यातून टीडीसची रक्कम प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी, असा मुद्दा पुढे आला होता. त्यानुसार आज चर्चा झाली. श्री. महाजन यांनी गोव्याने कपात केलेली रक्कम महाराष्ट्र परत देईल किंवा गोव्याने टीडीस कपात करून सर्व रक्कम महाराष्ट्राकडे द्यावी, महाराष्ट्र शासन प्रकल्पग्रस्तांना पूर्ण रक्कम देईल. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊ, अशा प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस, सचिव संजय नाईक, उपाध्यक्ष राजन गवस, लक्ष्मण गवस, कृष्णा देसाई, संजय गवस आदींनी श्री. केसरकर यांच्यासोबत श्री. महाजन यांची भेट घेतली. श्री. केसरकर यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू योग्यरीत्या मांडली. 

पूर्ण रक्कम देऊन अपेक्षा पूर्ण करा
गोवा शासन टीडीएसपोटी प्रत्येकाचे ३३ हजार ६५० रुपये कपात करणार आहे. ९४७ प्रकल्पग्रस्तांची मिळून ३ कोटी १८ लाख ६६ हजार ५५० रुपये एवढी रक्कम कपात होणार आहे. ‘तिलारी’च्या किरकोळ कामांवर प्रकल्पाधिकारी ठेकेदाराशी मिळून कोट्यवधी रुपये अनाठायी खर्च घालतात. त्यांच्यासाठी तीन कोटी रुपये अगदीच किरकोळ आहे. आता हा प्रश्‍न संपविण्याची वेळ आली आहे. युती सरकारकडून असलेली अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी.

Web Title: tds amount gives in tilari project