पेन्शनच्या चौकशीसाठी शिक्षक समितीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - अंशदान पेन्शन योजनेची हिशेब पत्रके संबंधित शिक्षकांना न देणाऱ्या व या योजनेत अफरातफर झाल्याच्या आरोप करूनही त्याची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह या योजनेची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हा परिषद भवनासमोर दुपारी धरणे आंदोलन छेडण्यात आले.     

सिंधुदुर्गनगरी - अंशदान पेन्शन योजनेची हिशेब पत्रके संबंधित शिक्षकांना न देणाऱ्या व या योजनेत अफरातफर झाल्याच्या आरोप करूनही त्याची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह या योजनेची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हा परिषद भवनासमोर दुपारी धरणे आंदोलन छेडण्यात आले.     

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन छेडले होते. या वेळी शिक्षक नेते भालचंद्र चव्हाण, सरचिटणीस चंद्रसेन पाताड़े, चंद्रकांत अणावकर, नामदेव जांभवडेकर, सुरेखा कदम, श्रीकृष्ण नानचे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले.

परिभाषित अंशदान पेन्शन योजना सुरू झाल्यापासून शिक्षक वगळता इतर शासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खाती शासन समतुलनीय १०% हिस्सा रक्कम नियमित जमा केली जाते, मात्र शिक्षकांच्या खाती ही रक्कम जमा केली जात नाही. त्याची हिशेब पत्रके दिली जात नाहीत? कपात केलेली रक्कम जाते कुठे? याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे या योजनेबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे कणकवली पंचायत समिती सभेत या योजनेत १५ लाखांचा अपहार असल्याचा आरोपही केला होता; मात्र अद्यापही प्रशासनाचे या योजनेची हिशेब पत्रके दिलेली नाहीत, तसेच योजनेत अफरातफर झाल्याच्या आरोपाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे परिभाषित अंशदान पेंशन योजनेची हिशेब पत्रके संबंधित शिक्षकांना न देणाऱ्या व या योजनेत अफरातफर झाल्याच्या गंभीर आरोप करूनही त्याची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह या योजनेची सखोल चौकशी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले.

Web Title: Teachers pension committee to probe movement