आख्खं कोकण फुल्ल टेन्शनमध्ये: लंडनमधील दहा जण रत्नागिरीत

Ten people from London to Ratnagiri health system full alert
Ten people from London to Ratnagiri health system full alert

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना लंडनमधील दहाजण जिल्ह्यात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश असताना  लंडनमधील दहा जणांनी आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यांचा शोध लागला असून 7 जण रत्नागिरी तर 3 संगमेश्‍वर तालुक्यातील आहेत. सातपैकी पाच जणांना सुरक्षेच्या कारणास्तव स्वॅब टेस्ट करून एमआयडीसी येथील विलगीकरण लक्षात ठेवले आहे.

  
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलिस त्यावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी आहे. त्यात ब्रिटनसह अन्य राज्यांमध्ये कोरोनाचा दुसरा प्रकार आढळून आला आहे. तो वेगाने पसरत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे परदेशातील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. 
या परिस्थितीत जिल्ह्यात लंडनहून दहाजण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मागील दहा दिवसांत हे दहाजण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. तत्काळ या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला. यापैकी 7 जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर 3 जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यातील 7 जणांपैकी एकजण मद्रास येथे तर दुसरा रायगड येथे गेला आहे. उरलेले पाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तसेच इतर दोघांचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. हे सर्व स्थानिक असून नोकरी, व्यवसायानिमित्त लंडनला गेले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्याची अजून खात्री झालेली नाही.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com