बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रत्नागिरी - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने आज दहा वर्षे सक्तमजुरी सुनावली. हा प्रकार 17, 21 व 22 ऑक्‍टोबर 2015 ला झर्ये येथील नावेली नदीवरील करवंदाची कोंड या ठिकाणी घडला होता. अशोक बाबाल्या सनगले (वय 42, रा. कदमवाडी-झर्ये, ता. राजापूर) असे या आरोपीचे नाव आहे. 

रत्नागिरी - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने आज दहा वर्षे सक्तमजुरी सुनावली. हा प्रकार 17, 21 व 22 ऑक्‍टोबर 2015 ला झर्ये येथील नावेली नदीवरील करवंदाची कोंड या ठिकाणी घडला होता. अशोक बाबाल्या सनगले (वय 42, रा. कदमवाडी-झर्ये, ता. राजापूर) असे या आरोपीचे नाव आहे. 

संबंधित पीडित अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिली होती. तो मुलगा सायंकाळी सात वाजता मित्राकडे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्या वेळी वापर नसलेल्या पिठाच्या चक्कीच्या गिरणीत बोलावून सनगले याने लैंगिक अत्याचार केले होते. तसेच त्याने 22 ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान पीडित मुलावर अत्याचार करून त्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या वेळी आरोपीचा साथीदार सचिन कदम यानेही धमकी दिली होती. या प्रकरणी पीडिताने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून आरोपीसह सचिन कदम याच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी 377, 506, सह 34 व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 4 व 8 अन्वये गुन्हा दाखल केला होता. राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. आर. काळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

आज या खटल्याचा निकाल लागला. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी आरोपीला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4 मध्ये दोषी ठरविले. त्याला दहा वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, कलम आठमध्ये तीन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कैद, तसेच कलम 506 अन्वये दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कैद, अशी शिक्षा ठोठावली. या शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत. या प्रकरणात धमकी देणाऱ्या कदम याला दोषमुक्त केले आहे. 

Web Title: Ten years rigorous imprisonment