कामासाठी बाराशे कोटींची निविदा; महामार्ग चौपदरीकरण

नवीन वर्षात वेगाने काम शक्य
कामासाठी बाराशे कोटींची निविदा; महामार्ग चौपदरीकरण

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत संगमेश्वर ते लांजा या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कंपनीला डिसेंबरअखेरपर्यंत नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी मुदत दिली आहे. त्या कंपनीकडून कार्यवाही झाली नाहीच तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक हजार २०० कोटींची नवीन कामाची निविदाही काढली आहे. त्यामुळे रखडलेल्या या कामाला नवीन वर्षात वेगाने सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संगमेश्वर ते लांजा या टप्प्यातील ९० किलोमीटरचे काम एमईपीकडे दिले होते. त्यासाठी १३०० कोटी रुपये मंजूर होते. या टप्प्यातील कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु ठेकेदाराकडून त्या कामाला चालना मिळू शकली नाही. ठिकठिकाणी केलेली खोदाई अपूर्ण अवस्थेत आहे. काम पूर्ण करण्यासाठी दिलेली डेडलाईन पूर्ण होत आली असून वाढीव मुदतही दिली गेली होती. त्याचाही फायदा उठवता आला नाही. याची गंभीर दखल केंद्रीय स्तरावरून घेण्यात आली होती. याबाबत सातत्याने मंत्री, खासदार, आमदारांकडून पाठपुरावाही सुरु होता. त्याला यश आले असून केंद्राने रखडलेल्या दोन टप्प्यातील कामांची नवीन निविदा काढण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार कार्यवाही झाली असून आरवली ते कांटे (३९.२३ कि.मी.) आणि कांटे ते वाकेड (४९.१५ कि.मी.) या टप्प्यातील कामांची बाराशे कोटीची निविदा नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी काढली आहे. तोपर्यंत जुन्या कंपनीला त्यांच्या जबाबदारीवर नवीन ठेकेदाराकडे काम वर्ग करण्यासाठी मुदत दिली आहे. ३० डिसेंबरपर्यंतची मुदत असून त्यावर कार्यवाही झालीच नाही तर निविदेनुसार ठेकेदार नियुक्ती केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

दहा टप्प्यात काम

चौपदरीकरणाचे दहा टप्प्यात काम सुरू असून त्यातील कशेडी ते परशुराम घाटाचे काम ९८ टक्के, वाकेड ते तळगाव आणि तळगाव ते कळमट ९५ टक्के तर कळमट ते झाराप हे काम ९९. ४७ टक्के झाले आहे. परशुराम घाट ते आरवली ४० टक्के काम पूर्ण झाले असून आरवली ते कांटे ९ टक्के आणि कांटे ते वाकेड १६ टक्केच झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com