महसूल विभागातर्फे होणार दहावी कृषिगणना

तुषार सावंत
गुरुवार, 6 एप्रिल 2017

प्रशिक्षण सुरू - जमीन; लागवगड क्षेत्र, पीकपाण्याची नोंद डिजिटल स्वरूपात 
कणकवली - महसूल खात्याकडील लॅण्ड रेकॉर्डच्या आधारे यंदा अद्ययावत जमीन आणि कृषीची गणना होणार आहे. याबाबत प्रशिक्षण दिले जात असून जमीनदार शेतकऱ्यांच्या सातबाराबरोबरच लागवगडीची आणि पीकपाण्याची नोंद ‘डिजिटल’ स्वरूपात तयार केली जाणार आहे. 

राज्यात पहिली कृषिगणना १९७७ मध्ये झाली. त्यानंतर सातवी कृषिगणना २०००-२००१ तसेच आठवी कृषिगणना २०१०- ११ हे वर्ष पायाभूत मानून २०११-१२ मध्ये झाली. आता पाच वर्षांनी दहावी कृषी गणना होत आहे. सर्व प्रकारच्या जमिनींच्या नोंदी सातबारा संगणकावर ऑनलाइन झाले आहेत.

या सर्व अद्ययावत माहितीच्या आधारावर तलाठ्यांकडून गननेची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविली जात आहे. यासाठी तलाठी आणि मंडलअधिकारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी संगणक प्रणाली सॉफ्टवेअर विकसित केले आहे. 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात महसुली रेकॉर्डवरून जमिनींच्या नोंदीवरून खातेदार शेतकऱ्यांची गावनिहाय, तालुकानिहाय माहिती संकलित केली जाईल. यात शेतकऱ्यांचे नाव, त्याने धारण केलेले एकूण क्षेत्र, गट नंबर आदीच्या माहितीचा समावेश असेल. यानंतर तलाठ्याकडून संबंधित शेतकऱ्यांची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर), लिंग (स्त्री, पुरुष, संस्था) आणि क्षेत्राबाबतची माहिती भरून घेतली जाणार आहे. जमीन धारणेनुसार शेतकऱ्यांची दहा गटांत वर्गवारी होणार आहे. सर्वात लहान गट ० ते ४९ आर जमीन धारणेचा तर मोठा गट २० हेक्‍टर किंवा त्याहून अधिक धारणेचा असेल. अशी गणना दर पाच वर्षांनी होते.

यंदा सन २०१५-१६ हे पायाभूत वर्ष मानून ही गणना होत आहे. परंतु आता संपूर्ण सातबारा आणि ८ अ, फेरफारच्या नोंदी, वारस नोंदी या अद्ययावत पद्धतीने डिजिटल स्वरूपात केल्या आहेत. या नोंदी पूर्ण झाल्यानंतर रॅण्डम सर्व्हे पद्धतीनुसार शेतकऱ्यांची विस्तृत माहिती उपलब्ध होणार आहे.

महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सोपविलेली कामे व जबाबदाऱ्या निश्‍चित करून शासनाने कृषी गणनेबाबत यापूर्वीच परिपत्रक 
जारी केले आहे. यानुसार कृषी गणनेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना मानधनही मिळणार आहे.

Web Title: tenth agriculture counting by revenue department