esakal | ....स्वतःचा निकाल पाहण्याआधीच अनुष्काची चटका लावणारी एक्झीट...
sakal

बोलून बातमी शोधा

tenth result anushka desai story in sangameshwar

ती अतिशय होतकरू होती मनमिळावू आणि शाळेत सर्वांची लाडकी होती. मात्र

....स्वतःचा निकाल पाहण्याआधीच अनुष्काची चटका लावणारी एक्झीट...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर (रत्नागिरी) :  ती अतिशय होतकरू होती मनमिळावू आणि शाळेत सर्वांची लाडकी होती. मात्र दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला. आणि निकालानंतर प्रत्येकाला ती जाण्याची घटना चटका लावणारी ठरली. संगमेश्वर तालुक्यातील मांजरी कलकदे येथील अनुष्का देसाई या युवतीची ही दुर्दैवी कहाणी आहे.नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तिने 65 टक्के गुण मिळवले आहे मात्र सहा दिवसांपूर्वी तिने या जगाचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा- अंधारात ही तिने लावली प्रकाशाची ज्योत : अशिक्षित कुटुंबातली गीता झाली ज्ञानशलाका.... -


दहावीच्या परीक्षेतील तिचे यश पाहण्यासाठी आज अनुष्का या जगामध्ये नाही. मात्र तिचा एकूणच स्वभाव अनेकांना चटका लावणारा ठरला. सोमेश्वर विद्यालय विले- मांजरे या शाळेत शिकणाऱ्या अनुष्का उदय देसाई हिला रात्री झोपेतच सर्पदंश झाला होता. उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात तिला तब्बल 64.5 टक्के गुण मिळाले. अनुष्काची आई गेली अनेक वर्षे आजारी असल्याने आपल्या आईची सेवा ती मनापासून करत असे आणि ही सेवा करत करतच ती शिकत होती. तिच्या या कर्तुत्वाचा सर्वांनाच अभिमान होता.

हेही वाचा- जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग ;  कोकणात या गावात होणार क्वारंटाईन सेंटर सुरू .... -

अतिशय मनमिळावू आणि शाळेत व घरात ती सर्वांचीच लाडकी होती. 25 जुलै रोजी रात्री विषारी प्राण्याने तिच्या हाताला दंश केला. झोपेत झालेला दश प्रारंभी तिलाही समजला नाही. त्रास होऊ लागल्यानंतर तिला उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच तिने आपला शेवटचा श्वास घेतला. अत्यंत गुणवान अभ्यासू कष्टाळू आणि सर्वांची लाडकी अशी ही अनुष्का जाण्याने तिच्या कुटुंबावर तर मोठा झाला झाला, मात्र संस्थेलाही मोठे दुःख झाले. दहावीचा निकाल झाल्यानंतर अनुष्काच्या आठवणीने अनेकांना तिची आठवण झाल्याखेरीज राहिली नाही.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top