‘टेरव’ची बहुद्देशीय प्रतिकृती राष्ट्रीय स्तरावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

१५ संकल्पनांची एकत्रित मांडणी - राज्यस्तरीय प्रदर्शनात यश
चिपळूण - तालुक्‍यातील टेरव येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बहुद्देशीय प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. टेरवच्या सुमन विद्यालयाच्या संयम सूरज कदम, भूपेश रामदास पांचाळ या विद्यार्थ्यांनी बहुद्देशीय उपकरणाची मांडणी केली होती. या विद्यार्थ्यांनी माध्यमिक गटात (नववी ते बारावी) उपकरणाद्वारे १५ संकल्पनांची एकत्रित मांडणी केली होती.

१५ संकल्पनांची एकत्रित मांडणी - राज्यस्तरीय प्रदर्शनात यश
चिपळूण - तालुक्‍यातील टेरव येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बहुद्देशीय प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. टेरवच्या सुमन विद्यालयाच्या संयम सूरज कदम, भूपेश रामदास पांचाळ या विद्यार्थ्यांनी बहुद्देशीय उपकरणाची मांडणी केली होती. या विद्यार्थ्यांनी माध्यमिक गटात (नववी ते बारावी) उपकरणाद्वारे १५ संकल्पनांची एकत्रित मांडणी केली होती.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ 
(ता. वाळवा) येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात टेरवच्या ‘ऑल इन वन’ या प्रतिकृतीची निवड करण्यात आली.

घरात उंचावरील उपकरणांची साफसफाई करताना स्टूल घ्यावे लागते. अवघड जागेत उपकरणे हाताळताना अपघात होण्याची शक्‍यता असते. अपघात टाळून सहजरीत्या कामे होण्यासाठी ‘ऑल इन वन’ हे मॉडेल तयार केले. या बहुद्देशीय उपकरणात ॲडजेस्टेबल काठी, सायकलचे ब्रेक, विद्युत मोटार, ब्लेड्‌स, कटर, कैची, झेला, ब्रश, प्लास्टिक बाटली, 

कॅमेरा, सेल्फी स्टीक, वायपर ड्रील, स्प्रे बॉटल, मोबाइल आदी साहित्याचा वापर केला आहे. या उपकरणाचा उंचावरील फळे, फुले काढण्यासाठी, देठासहीत फळे इजा न होता काढणे, उंच भिंतीवरील बल्ब, सीएफएल स्टूल व खुर्चीशिवाय बदलता येतात. 

छतावरील झळमटे विनाकष्ट काढता येतात. छत व भिंतीवरील डाग काढणे, कलर रोलरच्या साह्याने छत व भिंत रंगकाम करणे, उंच कुंडीतील फुलझाडांना फवारणी करण्यासाठी स्प्रे बॉटलचा उपयोग, झाडांवरील फळे परिपक्व झालीत की नाही हे कॅमेऱ्याच्या साह्याने पाहता येते. उंच भिंतीला जमिनीवरूनच छिद्र मारण्यासाठी ड्रीलचा उपयोग केला जातो. उंचावरील फोटो फ्रेम साध्या व मोटार वायपरच्या साह्याने स्वच्छ करता येते. अल्पखर्चात गवत कापण्यासाठी या यंत्राचा वापर करता येतो.

शेतकऱ्यांपासून ते बांधकाम व्यावसायिकांना या उपकरणांचा वापर करता येईल. या उपकरणात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता कल्पकतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उपकरणांची उपयोगिता प्रभावीपणे सादर केल्याने त्याची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली. या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक अमोल टाकळे, मुख्याध्यापक प्रभाकर सुर्वे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

यावर्षी माध्यमिक गटात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केवळ टेरव विद्यालयाच्या प्रतिकृतीची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ व ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र शेंडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत टेरवच्या सुमन विद्यालयास गौरविण्यात आले. राज्यस्तरीय प्रदर्शनात यश मिळाल्याने जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमाकांत मोरे, सचिव प्रकाश कदम, खजिनदार अजित कदम, दशरथ कदम, सुधाकर कदम, अंकेश मोरे, मुख्याध्यापक मंदार सुर्वे व पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

संयम कदम व भूपेश पांचाळ या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: terav multi-purpose replica on national lavel