'या प्राण्याने' भरवली शेतकर्‍यांच्या हृदयात धडकी....

Terror of elephants again in sindudurg kokan marathi news
Terror of elephants again in sindudurg kokan marathi news

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग)  : वीजघर, बांबर्डे परिसरात हत्तींची पुन्हा दहशत सुरु झाली. त्यांनी कालच्या एका रात्रीत जवळपास साडेतीन हजार केळी जमीनदोस्त केल्या. त्यामुळे एका रात्रीत लाखो रुपयांची हानी केली. काही आठवडे अज्ञातवासात असलेले हत्ती पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे. 
तिलारी खोऱ्यात हत्तींचा वावर कायमचा झाला आहे. ऑक्‍टोबर 2007 मध्ये आलेल्या हत्तींचा उपद्रव एका तपानंतरही सुरुच आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक बळी घेतलेत.

कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी मोहिमा राबवल्या गेल्या. शेती, बागायती आणि वस्तीपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी अनेक पर्याय राबवले; पण हत्तींकडून नुकसानीचे सत्र सुरुच आहे. वीजघर-बांबर्डे परीसरात ते गेल्या दोन रात्रीपासून वावरत आहेत. त्यांच्याकडून नुकसानही सुरु आहे. काल (ता.24) रात्री मात्र त्यांनी केळी बागायतीत घुसून केळीच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. सिद्धेश राणे, संदेश राणे, भीमराव राणे या शेतकऱ्यांच्या जवळपास साडेतीन हजार केळी त्यांनी उद्‌ध्वस्त केल्या.

अनेक गावे पायाखाली

हत्तींकडून आता सातत्याने नुकसान होण्याची शक्‍यता आहे. ते अनेक गावे पायाखाली घालत नुकसान सुरु ठेवतील. त्यामुळे त्यांची दहशत आता शेतकऱ्यांमध्ये आहे. वनविभागाची माणसे पंचनाम्यासाठी वेळेत येत नाहीत, सबबी सांगतात, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्रात तिष्ठत ठेवतात, अशी तक्रार नुकसानग्रस्तांची आहे. एकीकडे हातातोंडाशी आलेले पीक वन्यप्राणी हिसकावून नेत असताना वनविभाग आणि शासनाने त्यांना योग्य भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

केळीच्या गाभ्यावर नजर 
हत्ती केळीचे रोप सोलून आतील गाभा तेवढा खातात. त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असते. सध्या उष्णतेने उच्चांक गाठल्याने हत्तींनी केळीच्या बागांना लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. 

विधानसभेत वाचा फोडावी 
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी हत्तीबाधित शेतकऱ्यांसह अन्य वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत विधानसभेत प्रश्‍न मांडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com