सांस्कृतिक दहशतवादाचा समाजाला धोका - प्रा. मिलिंद जोशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

कणकवली - सध्याच्या सांस्कृतिक दहशतवादामुळे व्यवस्था बिघडविणाऱ्यांनाच देशभक्‍त ठरवले जात आहे. अशा प्रवृत्तींमुळे साहित्य, संस्कृती आणि समाज यांना धोका पोचत आहे, असे मत लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी येथे केले.

येथील नगर वाचनालयात आप्पासाहेब पटवर्धन स्मृती व्याख्यानमाला झाली. यात प्रा. जोशी बोलत होते. सध्या सांस्कृतिक दहशतवाद अधिक उफाळला आहे. या दहशतवादातून समाज कधीच पुढे जात नसतो. उलट यातून संस्कृती रसातळालाच जाते, असेही ते म्हणाले.

व्याख्यानमालेचे उद्‌घाटन साहित्यिक आनंद अंधारी यांच्याहस्ते झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डी. पी. तानवडे, कार्यवाह महेश काणेकर, सौ. जोशी, प्रा. लालासाहेब घोरपडे, ग्रंथपाल जान्हवी जोशी आदी उपस्थित होते.‘साहित्य-संस्कृती आणि समाज’ या विषयावर बोलताना प्रा. जोशी म्हणाले, ‘‘सध्याच्या सांस्कृतिक दहशतवादावर अनेक साहित्यिक तसेच सुशिक्षित मंडळीही बोलत नाहीत. विचार करीत नाहीत हे चित्र अधिक धोकादायक आहे. सर्वच संतांनी वैश्‍विक एकात्मतेचा संदेश दिला. परंतु या संतांनाही आपण जाती-धर्मांमध्ये विभागले आहे. हा आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव आहे. वस्तुत: या सर्वांच्या मुळाशी बदललेले राजकारण आहे. या राजकारणात संस्कृती आणि समाज दुभंगत चालला आहे.’’

श्री. तानवडे यांनी प्रास्ताविक केले. श्री. काणेकर यांनी आभार मानले. व्याख्यानानंतरच्या चर्चेत प्रा. अनिल फराकटे, डॉ. शमिता बिरमोळे, नीता कामत, श्री. ठाकूर, आबा तेली आदींनी भाग घेतला.

सांस्कृतिक परिवर्तन होत असताना समाजमानसही बदलण्याची गरज असते. तसे न झाल्यामुळे आजवर आपला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला नाही. बदल हा अंतःकरणातून नाही तर डोक्‍यातून स्वीकारला गेला पाहिजे. आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. व्यक्‍तीला एकटं पाडणारी नाही. सुधारण्याचा वेग कितीही वाढत असला तरी संस्कृतीतूनच माणूस समृद्ध होत असतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
- प्रा. मिलिंद जोशी, लेखक

Web Title: Terrorism threat to the cultural community