राजवाडा व समाधीदर्शनाने थिबा राजाचे कुटुंबीय गहिवरले! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

रत्नागिरी - म्यानमारचे (ब्रह्मदेश) उपराष्ट्रपती, लष्करप्रमुख व थिबा राजाच्या कुटुंबीयांनी थिबाच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त समाधी, राजवाड्याचे दर्शन घेऊन अत्यानंद व्यक्त केला.

आपण कृतकृत्य झालो, अशी भावना या साऱ्यांनी व्यक्त केली. थिबाच्या कुटुंबीय व भिक्षूगणांनी सेल्फीही काढून घेतल्या. म्यानमारमध्ये थिबाचे वस्तुसंग्रहालय करण्याचा मानस असून त्याकरता भारताची मदत लागणार आहे, असे या वेळी त्यांनी सांगितले. 

ब्रह्मदेशचा शेवटचा राजा थिबाचे निधन 16 डिसेंबर 1916 ला थिबा राजवाड्यात झाले. त्यांच्या निधनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मॅण्ट स्यू, लष्करप्रमुख मीन हॉंग अलाइंग, राजाचे खापर पणतू यू सो विन व अन्य कुटुंबीयांनी थिबा राजाच्या समाधीचे दर्शन घेतले. 

थिबाच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजीनगर येथील समाधीच्या ठिकाणी आज सकाळी सात वाजता म्यानमारचे उपराष्ट्रपती, लष्करप्रमुख, राजाचे कुटुंबीयांनी समाधीस्थळी प्रार्थना करून आदरांजली वाहिली. भिक्षुक डॉ. कुमारा भिवमसा, डॉ. ज्ञानिश्‍वर व अन्य भिक्षूगणांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त सर्व चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. या वेळी म्यानमारचे भिक्षूसंघ व स्थानिक बौद्ध अनुयायी उपस्थित होते. त्यानंतर सर्व मान्यवरांनी थिबा राजवाड्याला भेट दिली. येथे राजवाड्यातील दालने, थिबा व त्यांच्या कुटुंबीयांनी वापरलेल्या वस्तू पाहिल्या. थिबा राजाचे फोटो, काही वस्तू पाहून कुटुंबीय भारावले. त्यांचा भारतातील व राजवाड्यातील जीवनकाळाविषयी लेखिका सुधा शहा यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

Web Title: Thiba death anniversary